IND vs SA Match Details: आजपासून रंगणार भारत- दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटीचा थरार! वाचा या सामन्याबद्दल A टू Z माहिती

India vs South Africa 2nd Test Match Details: भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये आजपासून दुसऱ्या कसोटी सामन्याचा थरार रंगणार आहे. हा सामना केपटाऊनच्या मैदानावर खेळला जाणार आहे.
rohit sharma dean elgar
rohit sharma dean elgargoogle
Published On

India vs South Africa Head To Head Record And Match Details:

भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये आजपासून दुसऱ्या कसोटी सामन्याचा थरार रंगणार आहे. हा सामना केपटाऊनच्या मैदानावर खेळला जाणार आहे. मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला १ डाव आणि ३२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. दरम्यान दुसरा सामना जिंकून भारतीय संघ ही मालिका १-१ च्या बरोबरीत आणण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

भारतीय संघाने मालिकेतील पहिला कसोटी सामना गमावला आहे. यासह भारतीय संघाचं दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचं स्वप्नं पुन्हा एकदा भंगलं आहे. मालिका बरोबरीत आणण्यासाठी भारतीय संघाला दुसरा कसोटी सामना कुठल्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे.

हा सामना केपटाऊनच्या मैदानावर खेळला जाणार आहे. भारतीय संघाचा या मैदानावरील रेकॉर्ड अतिशय निराशाजनक राहिला आहे. भारतीय संघाने या मैदानावर ६ सामने खेळले आहेत. यादरम्यान ४ सामन्यांमध्ये पराभव झाला आहे. तर २ सामने ड्रॉ झाले आहेत. म्हणजेच भारतीय संघाला या मैदानावर एकही सामना जिंकता आलेला नाही.

rohit sharma dean elgar
IND vs SA Match Timing: भारत-दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटी सामन्याची वेळ बदलली! किती वाजता सुरु होणार सामना?

कशी असेल खेळपट्टी?

या खेळपट्टीवर गवताचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजांना या खेळपट्टीतून मदत मिळू शकते. खेळपट्टीसह हवामान देखील वेगवान गोलंदाजांसाठी पोषक ठरू शकते. इथे हवा सुरू असल्यास वेगवान गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरेल. या खेळपट्टीवर सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना मदत मिळेल. मात्र सामना जसा पुढे जाईल, तसं फिरकी गोलंदाजांना मदत मिळायला सुरुवात होईल. (Latest sports updates)

rohit sharma dean elgar
IND vs SA: पहिल्या कसोटीत सुपरफ्लॉप,तरीही रोहित या खेळाडूला देणार संघात स्थान!स्वत:केला मोठा खुलासा

अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११:

भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टिरक्षक), रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा/मुकेश कुमार.

दक्षिण अफ्रीका:

डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्करम, टोनी डिजॉर्जी, कीगन पीटरसन, जुबायर हमजा, डेव्हिड बेडिंघम, काइल वेरीन (यष्टिरक्षक), मार्को यान्सेन, केशव महाराज/लुंगी एन्गिडी, कगिसो रबाडा, नांद्रे बर्गर.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com