आशिया चषकाचा अंतिम सामना भारत विरूद्ध श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. कोलंबोच्या मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकानेा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
अंतिम सामन्यात भारताचा संघ गोलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरला आहे. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना मोहम्मद सिराजने दमदार गोलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले आहे.
या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.मात्र हा निर्णय भारतीय संघातील वेगवान गोलंदाजांनी पूर्णपणे चुकीचा ठरवला आहे. या डावातील चौथ्या षटकात मोहम्मद सिराजने ४ विकेट्स घेत श्रीलंकेचा अर्धा संघ तंबूत धाडला आहे.
एकाच षटकात घेतल्या ४ विकेट्स..
मोहम्मद सिराजच्या गतीसमोर श्रीलंकेचे फलंदाज लोटांगण घालताना दिसून आले आहेत. जसप्रीत बुमराहने कुसल मेंडिसला बाद केल्यानंतर मोहम्मद सिराजने एकाच षटकात श्रीलंकेच्या ४ विकेट्स घेतल्या. तर झाले असे की, भारतीय संघाकडून चौथे षटक टाकण्यासाठी मोहम्मद सिराज गोलंदाजीला आला होता. (Latest sports updates)
या षटकातील पहिल्याच चेंडूवर त्याने निसंकाला २ धावांवर बाद करत माघारी धाडले. पॉइंटला असलेल्या रविंद्र जडेजाने भन्नाट झेल घेतला. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर त्याने सदिरा समरविक्रमाला शून्यावर बाद करत माघारी धाडले.
त्यानंतर त्याने चरीथ असलंकाला शून्यावर बाद करत माघारी धाडले. या षटकातील शेवटच्या चेंडूवर त्याने धनंजय डी सिल्वाला बाद केलं यासह त्याने चौथ्या षटकात ४ धावा खर्च करत ४ गडी बाद केले.
या सामन्यासाठी अशी आहे भारतीय संघाची प्लेइंग ११:
रोहित शर्मा (कर्णधार ), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जड़ेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.