rohit sharma twitter
Sports

IND vs SA: पहिल्या कसोटीत सुपरफ्लॉप,तरीही रोहित या खेळाडूला देणार संघात स्थान!स्वत:केला मोठा खुलासा

Rohit Sharma Statement: भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये दुसरा कसोटी सामना केपटाऊनच्या मैदानावर खेळला जाणार आहे.

Ankush Dhavre

IND vs SA, 2nd Test:

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना आज केपटाऊनमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्याला दुपारी २ वाजता सुरुवात होणार आहे. वनडे आणि टी -२० मालिकेत दमदार खेळ करणारा भारतीय संघ सध्या कसोटीत मालिकेत १-० ने पिछाडीवर आहे.

पहिल्या कसोटीत भारतीय संघाला १-० ने पराभवाचा सामना करावा लागला होता. या कसोटी सामन्यात प्रसिद्ध कृष्णाला पदार्पण करण्याची संधी देण्यात आली होती. या सामन्यात गोलंदाजी करताना त्याने २० षटकात ९३ धावा खर्च केल्या होत्या.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला जेव्हा प्लेइंग ११ बाबत निर्णय घेण्यात आला त्यावेळी तो म्हणाला की, ' आमची टीम मॅनेजमेंटसोबत चर्चा झाली. आम्हाला संघात कसे गोलंदाज हवे आहेत. आम्ही अजूनपर्यंत आमची प्लेइंग ११ ठरवलेली नाही. आमचे सर्व खेळाडू फिट असून सिलेक्शनसाठी उपलब्ध आहेत. आम्ही लवकरच याबाबत निर्णय घेऊ.'

तसेच रोहित पुढे म्हणाला की, ' मला माहित आहे की, आमच्या गोलंदाजांकडे अनुभव नाही. मात्र अशा स्थितीत त्यांना बॅक करणं गरजेचं आहे. असं कुठल्याही संघासोबत होऊ शकतं. गेल्या सामन्यानंतर मी म्हटलं होतं की, प्रसिद्ध आपला पहिलाच सामना खेळतोय. त्यामुळे कोणीही नर्व्हस होऊ शकतं.' (Latest sports updates)

खेळपट्टीबाबत बोटलाना रोहित शर्मा म्हणाला की, ' न्यूलॅंड्सची खेळपट्टी ही सेंच्युरियनसारखीच वाटत आहे. कदाचित या खेळपट्टीवर सेंच्युरियनइतकं गवत नसेल. पण परिस्थिती खूप महत्वाची ठरेल. या सेंच्युरियनच्या तुलनेत येथील वातावरण खूप उष्ण आहे.'

भारतीय संघाचा केपटाऊनच्या मैदानावरील रेकॉर्ड पाहिला तर, या मैदानावर भारतीय संघाने ६ सामने खेळले आहेत. यादरम्यान दक्षिण आफ्रिकेने ४ सामने जिंकले आहेत. तर कसोटी सामने ड्रॉ झाले आहेत. भारताला केपटाऊनमध्ये एकही कसोटी सामना जिंकता आलेला नाही. त्यामुळे भारतीय संघाकडे हा रेकॉर्ड बदलण्याची संधी असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sansad Ratna Award 2025 : महाराष्ट्रातील ७ खासदारांनी दिल्लीत नाव गाजवलं; सुप्रिया सुळे, वर्षा गायकवाड यांच्यासह निशिकांत दुबेंनाही संसदरत्न पुरस्कार

Best Indian Patriotic Movies: या विकेंडला बघा देशभक्ती जागवणारे हे ७ चित्रपट

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील काँग्रेस कमिटीमध्ये काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा

Jasprit Bumrah Retirement : टीम इंडियाला मोठा हादरा! जसप्रीत बुमराह कसोटीतून निवृत्ती घेणार?

Nashik Food : नाशिकच्या Top 7 डीशेस ज्या पाहताच तोंडाला सुटेल पाणी

SCROLL FOR NEXT