टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर आता दुसऱ्या सामन्यात कमबॅक करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न आहे. त्यासाठी कोच राहुल द्रविडसह रोहित शर्माने रणनिती आखली आहे. मात्र, अशातच या सामन्यात पाऊस खोडा घालण्याची शक्यता आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना ३ जानेवारीपासून खेळला जाणार आहे. केपटाऊन येथील न्यूलँड्स मैदानावर दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत. तसं पाहता भारतीय संघाचा (Team India) रेकॉर्ड या मैदानावर फार चांगला राहिलेला नाही.
आजपर्यंत येथे एकही सामना (Sport News) जिंकू शकलेला नाही. त्यामुळे एकीकडे दुसरा कसोटी सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचे आव्हान कर्णधार रोहित शर्मापुढे असणार आहे. त्यासाठी भारतीय संघाने रणनिती देखील आखली आहे. पण या रणनितीवर पाणी फिरू शकतं.
कारण, केपटाऊनमधील सामन्यादरम्यान दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. केपटाऊनच्या हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजनुसार, येथे पहिल्या तीन दिवस पावसाचा अंदाज नाही. पण शेवटचे दोन दिवस खराब हवामानामुळे सामन्यावर परिणाम होऊ शकतो.
सामन्याच्या चौथ्या दिवशीच म्हणजेच ६ जानेवारीला केपटाऊनमध्ये ६४ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पाचव्या दिवशी (७ जानेवारी) ५५ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. दक्षिण आफ्रिकेत भारताला आतापर्यंत एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. मालिका बरोबरीत संपवण्यात संघाला फक्त एकदा यश आले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.