भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना ३ जानेवारीपासून न्यूलँड्स येथे खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाचा कसोटीतला फॉर्म बघता ही मालिका सहज खिशात घालेल असं वाटलं होतं. मात्र, दक्षिण आफ्रिकेतलं मालिका विजयाचं स्वप्न अधुरंच राहिलं. टीम इंडिया पहिल्या कसोटीत पराभूत झाली. आता दुसरा कसोटी सामना नव्या वर्षात खेळवला जाणार आहे.
टीम इंडिया दुसरा कसोटी सामना (2nd Test Match) केपटाउनच्या न्यूलँड्समध्ये खेळणार आहे. हा सामना जिंकून मालिका अनिर्णित राखायची असेल तर, कर्णधार रोहित शर्मा काही कठोर निर्णय घेऊ शकतो. या सामन्यात रोहित शर्मा टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल करण्याची शक्यता आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
टीम इंडियाचा गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी मुकेश कुमार याला संधी दिली जाऊ शकते. दुसऱ्या सामन्यासाठी रोहित शर्माने बराच वेळ नेटमध्ये मुकेश कुमारसोबत सराव केला आहे. त्यामुळे मुकेश कुमारला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. (Latest sports updates)
टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये आणखी एक बदल होण्याची शक्यता आहे. अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाला संधी मिळू शकते. पहिल्या सामन्याच्या आधी जडेजा अनफिट होता. त्यामुळं तो खेळू शकला नाही. मात्र, आता तो फिट आहे. त्यामुळे तो प्लेइंग इलेव्हनमध्ये येऊ शकतो. तर आर. अश्विनला बाकावर बसावे लागू शकते.
टीम इंडियामध्ये दोन बदल होऊ शकतात. या मैदानावर आतापर्यंत भारताने सहा सामने खेळले आहेत. त्यातील दोन अनिर्णित राहिलेत. तर चार सामन्यांमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तत्पूर्वी पहिल्या कसोटी सामन्यात भारताला एक डाव आणि ३२ धावांनी हार पत्करावी लागली होती.
रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, शार्दुल ठाकूर.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.