Ind vs SA 2nd T20 Live BCCI / x
Sports

Ind vs SA 2nd T20 Live : पहिल्या पराभवानं हादरली दक्षिण आफ्रिका टीम; दुसऱ्या टी २० साठी प्लेइंग ११ मध्ये ३ बदल

India Vs South Africa 2nd T20 Live Update : मुल्लांपूरच्या महाराज यादवेंद्र सिंह इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरा टी २० सामना होत आहे. पहिल्या पराभवानं हादरलेल्या दक्षिण आफ्रिका संघानं दुसऱ्या सामन्यात एक नव्हे तर तीन बदल केले आहेत.

Nandkumar Joshi

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात आज, गुरुवारी (११ डिसेंबर) दुसरा टी २० सामना होत आहे. भारतानं टॉस जिंकला आहे. प्रथम फलंदाजीसाठी दक्षिण आफ्रिकेला निमंत्रित केलं आहे. चंदीगडच्या मुल्लांपूर येथे महाराज यादवेंद्र सिंह इंटरनॅशनल स्टेडियममध्ये होत असलेल्या या सामन्यात भारताचं नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे. या सामन्यात भारत प्रथम गोलंदाजी करणार आहे. दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हन घोषित झाल्या आहेत. पहिल्या सामन्यात पराभूत झालेल्या दक्षिण आफ्रिका संघानं या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये तब्बल तीन बदल केले आहेत.

सूर्यकुमारच्या नेतृत्वात भारतीय संघानं पहिल्या टी २० सामन्यात दक्षिण आफ्रिकेला १०१ धावांनी पराभूत केलं होतं. कटकच्या बाराबती स्टेडियमवर तो सामना झाला होता. पहिल्या सामन्यात हार्दिक पंड्यानं तडाखेबंद अर्धशतकी खेळी केली होती. अंतिम षटकांमध्ये केलेल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारतानं आव्हानात्मक धावसंख्या उभारली होती. तर दक्षिण आफ्रिकेला शंभरच्या आतच गुंडाळून भारतानं मोठा विजय मिळवला होता.

दुसरा टी २० सामना जिंकून या मालिकेत २-० ने आघाडी घेण्याच्या मनसुब्याने भारतीय संघ मैदानात उतरेल यात शंकाच नाही. दक्षिण आफ्रिका संघानं दुसऱ्या टी २० सामन्यासाठी प्लेइंग ११ मध्ये तीन बदल केले आहेत. रीजा हेंड्रिक्स, जॉर्ज लिंडे आणि ओटनील बार्टमॅन या तिघांना प्लेइंग ११ मध्ये संधी दिली आहे. तर भारतीय संघानं प्लेइंग ११ मध्ये कोणताही बदल केलेला नाही.

भारताची प्लेइंग ११ अशी असेल

अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, जसप्रीत बुमराह, वरूण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग

दक्षिण आफ्रिका प्लेइंग ११

क्विंटन डीकॉक, एडन मार्करम, रिजा हेंड्रिक्स, डेवाल्ड ब्रेविस, डेविड मिलर, डोनोवन फरेरा, मार्को जानसेन, जॉर्ज लिंडे, ओटनील बार्टमॅन, लुथो सिम्पाला, लुंगी एनगिडी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zila Parishad-Corporation Election: जिल्हा परिषदेसह महापालिकेच्या निवडणुका कधी होणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितली तारीख

Maharashtra Live News Update: हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील बर्गेवाडी मध्ये भीषण आग

अंडे खाणार, कॅन्सर होणार? अंड्यांमध्ये बंदी असलेलं घातक रसायन?

Stale Chapati: रात्रीच्या शिळ्या चपात्यांना नवा ट्विस्ट; सकाळी मस्त बनवा मस्त टेस्टी नाश्ता

Peru Benefits: हिवाळ्यात भाजलेला पेरू खाल्ल्याने होतील 'हे' हेल्दी फायदे

SCROLL FOR NEXT