Rohit Sharma And Virat Kohli BCCI Central Contract
Rohit Sharma And Virat Kohli BCCI Central Contractsaam tv

Rohit Sharma-Virat Kohli : रोहित-विराटला आणखी एक धक्का, पगारातून २-२ कोटी रुपये कापणार?

Rohit Sharma and Virat Kohli BCCI Central Contract : बीसीसीआय दरवर्षी ए प्लस, ए, बी, सी या चार कॅटगरीमधील खेळाडूंचे सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट जाहीर करते. त्याची घोषणा २२ डिसेंबरला एजीएमच्या बैठकीत होणार आहे. यावेळी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या पगारातून २-२ कोटी कापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Published on

Rohit sharma virat kohli salary cut bcci central contract update : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय दरवर्षी A +, A, B, C या चार कॅटगरीमधील खेळाडूंचे सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट जाहीर करते. या वार्षिक करारात कोण कोणत्या कॅटगरीमध्ये असायला हवं, हे क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये खेळाडूंनी केलेल्या कामगिरीवर अवलंबून असतं. यावर्षी २२ डिसेंबरला काही खेळाडूंच्या वार्षिक कराराची घोषणा होण्याची शक्यता आहे. एजीएमच्या बैठकीत याबाबत घोषणा होऊ शकते. यावर्षी वार्षिक करार जाहीर करण्यापूर्वी पुढील चक्रात दिग्गज फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मानधनाबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, असे मीडिया रिपोर्ट्स आहेत. या दोन्ही खेळाडूंच्या मानधनात कपात केली जाऊ शकते, असे वृत्त आहे.

बीसीसीआयने (BCCI) मागच्या वेळी एप्रिल २०२५ मध्ये आपल्या खेळाडूंचे वार्षिक करार घोषित केले होते. मात्र, यावेळी वार्षिक सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट करण्याआधी भारतीय संघातील दिग्गज विराट कोहली आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्या सॅलरीत कपात करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे वृत्त आहे.

२२ डिसेंबरला एजीएमची बैठक

बीसीसीआय खेळाडूंच्या वार्षिक कराराची घोषणा २२ डिसेंबरला होणाऱ्या एजीएमच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेट संघातील दिग्गज फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली (Virat Kohli) हे वार्षिक कराराच्या ए प्लस कॅटगरीत राहतील किंवा नाही हे त्याच दिवशी समजेल. रोहित आणि विराटने टी २० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता ते दोघेही फक्त वनडे क्रिकेटमध्ये खेळत आहेत. हे दोघेही आयसीसी वनडे रँकिंगमध्ये अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी आहेत.

४ कॅटगरीत सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट

ए प्लस, ए, बी आणि सी या चार कॅटगरीत बीसीसीआयचा सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट केला जातो. यात कॅटगरीनुसार, खेळाडूंना एक निश्चित वार्षिक वेतन दिले जाते. त्याला रिटेनरशिप म्हटले जाते. हे वेतनातील रक्कम संबंधित खेळाडूंना वर्षभरात मिळतात. याशिवाय सामन्याचे मानधन वेगळे असते.

खेळाडूंची ग्रेड कशी ठरते?

1. जे खेळाडू कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करतात आणि तिन्ही फॉरमॅटमध्ये सातत्याने खेळतात त्यांना सर्वोच्च ग्रेड दिली जाते.

2. A + ग्रेड तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणाऱ्या संघातील महत्वाच्या खेळाडूंना दिली जाते. भारतीय कसोटी क्रिकेट संघ आणि वनडे संघाचा कर्णधार शुभमन गिल याला टी २० संघात उपकर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. गिल सध्या ए ग्रेडमध्ये आहे. त्याला ५ कोटी वेतन मिळते. जर त्याला प्रमोशन मिळालं तर, त्याचे वेतन ५ वरून ७ कोटी होईल.

3. खेळाडूंना दिली जाणारी ग्रेड ही मागील वर्षी त्यांनी केलेल्या कामगिरीवर अवलंबून असते. चांगली कामगिरी केली तर प्रमोशन दिले जाते. तर खराब फॉर्म आणि फिटनेस नसेल किंवा सातत्य नसेल तर त्या खेळाडूंचे ग्रेड देताना डिमोशन केले जाते.

4. कोणत्याही खेळाडूला ग्रेड सी हवी असल्यास काही सामने खेळावे लागतात. ३ कसोटी सामने किंवा ८ वनडे किंवा १० टी २० सामने खेळणे गरजेचे असते. केवळ अधिक सामने खेळले तर ग्रेड वाढवून दिली जात नाही.

5. बीसीसीआयच्या अपेक्षेनुसार, ज्या खेळाडूंना सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट दिले आहेत, ते फावल्या वेळेत रणजी ट्रॉफीसारख्या देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळायला हवेत. जे खेळाडू या स्पर्धा खेळत नाहीत, त्यांना कॉन्ट्रॅक्टमधून बाहेरही केले आहे.

  • ए प्लस ग्रेडमध्ये असलेल्या खेळाडूंना वर्षाला ७ कोटी रुपये वेतन मिळते. यात रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा आहेत.

  • ए ग्रेडमध्ये असलेल्या खेळाडूंना ५ कोटी रुपये मिळतात. त्यात मोहम्मद सिराज, केएल राहुल, शुभमन गिल, हार्दिक पंड्या, मोहम्मद शमी, रिषभ पंत यांचा समावेश आहे.

  • बी ग्रेडमध्ये तीन कोटी रुपये दिले जातात. त्यात सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, अक्षर पटेल, यशस्वी जयस्वाल आणि श्रेयस अय्यर हे खेळाडू आहेत.

  • सी ग्रेडमध्ये एक कोटी रुपये दिले जातात. त्यात रिंकू सिंह, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, सरफराज खान, शिवम दुबे, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, ईशान किशन, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, रजत पाटीदार, ध्रुव जुरेल, नितीश कुमार रेड्डी, अभिषेक शर्मा, आकाशदीप, वरूण चक्रवर्ती, हर्षित राणा यांचा समावेश आहे.

Rohit Sharma And Virat Kohli BCCI Central Contract
टीम इंडियानं वनडे मालिका खिशात घातली; आयसीसीनं अख्ख्या भारतीय संघाच्या खिशात हात घातला

विराट आणि रोहित शर्माचे वेतन कापणार?

विराट कोहली आणि रोहित शर्मा सध्या ए प्लस ग्रेडमध्ये आहेत. पण ते दोघेही आता टी २० आणि कसोटी क्रिकेट खेळत नाहीत. त्यामुळे त्यांना ए ग्रेडमध्ये घेतले जाऊ शकते. जर त्यांना ए ग्रेडमध्ये घेतलं तर, त्यांना वार्षिक करारानुसार प्रत्येकी २ कोटी रुपये कमी मिळतील.

Rohit Sharma And Virat Kohli BCCI Central Contract
Ind vs SA 1st T20: सूर्यकुमार यादवचा धक्कादायक निर्णय; हेड कोच गौतम गंभीरचा आवडता खेळाडू प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com