

गेल्या काही दिवसांत भारतीय संघात कधी नव्हे इतके प्रयोग आणि बदल झाले. कसोटी, वनडे असो की टी २० सामना, क्रिकेटच्या तिन्ही फॉमरॅटमध्ये हर्षित राणा हा भारतीय संघात खेळताना बघायला मिळाला. यावरून गौतम गंभीरवर टीकाही झाली. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी तर टीकेची झोड उठवली होती. पण पहिल्या टी २० सामन्यासाठी कर्णधार सूर्यकुमार यादव यानं धक्कादायक निर्णय घेतला आहे. गौतम गंभीरचा स्पेशल प्लेअर असलेल्या हर्षित राणाला प्लेइंग ११ मधून बाहेर काढण्यात आलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज, मंगळवारी पाच सामन्यांच्या टी २० मालिकेतील पहिला सामना होत आहे. कटकच्या बाराबती मैदानात हा सामना होत आहे. दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला आहे. प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव यानं टॉसनंतर प्रतिक्रिया दिली आहे. प्लेइंग ११ निवडणं सगळ्यात कठीण काम आहे. कारण टी २० वर्ल्डकप स्पर्धा खूपच जवळ आली आहे. या प्लेइंग इलेव्हनमध्ये महत्वाची बाब म्हणजे संजू सॅमसनला संधी मिळालेली नाही. त्याच्या जागी जितेश शर्मा याला विकेटकीपर-फलंदाज म्हणून संधी देण्यात आली आहे.
यापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघावर पाहुण्या संघानं विजय मिळवला होता. तर वनडे मालिकेत भारतीय संघानं पाहुण्या संघाला पराभूत केलं. आता या दोन संघांमध्ये टी २० मालिका होत आहे. २०२६ मध्ये होणाऱ्या टी २० वर्ल्डकपच्या दृष्टीने या मालिकेला महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अस्थिर असलेल्या प्लेइंग इलेव्हनवर सगळ्यांच्या नजरा असणार आहेत. कारण ज्या खेळाडूला प्लेइंग ११ मध्ये संधी मिळेल, तो खेळाडू टी २० वर्ल्डकपचाही भाग असेल, असे मानले जात आहे.
मागील काही सामन्यांमध्ये प्लेइंग ११ आणि फलंदाजी क्रम यामध्ये सातत्याने बदल बघायला मिळाला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची प्लेइंग ११ विशेष असणार आहे.
भारताची प्लेइंग ११
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरूण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग
दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग ११
क्विंटन डी कॉक, अॅडन मार्करम, ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, डेविड मिलर, डोनोवन फरेरा, मार्को जानसेन, केशव महाराज, लुथो सिम्पाला, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्खिया
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.