kagiso rabada twitter
क्रीडा

IND vs SA: कगिसो रबाडाची दमदार गोलंदाजी! दक्षिण आफ्रिकेसाठी पूर्ण केल्या ५०० विकेट्स

Ankush Dhavre

India vs South Africa, Kagiso Rabada Record News:

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा भारतीय संघाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी सामन्यात दमदार गोलंदाजी करताना दिसतोय. या कसोटी सामन्यात त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५०० गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे. हा कारनामा त्याने वयाच्या अवघ्या २८ वर्षी करून दाखवला आहे.

सेंच्युरियनमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात कगिसो रबाडाने आतापर्यंत ५ गडी बाद केले आहेत. यादरम्यान त्याने कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या प्रमुख फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली आहे. (Latest sports updates)

दक्षिण आफ्रिकेतील उसळी घेत असलेल्या खेळपट्टीचा कगिसो रबाडाने चांगलाच फायदा घेतला. त्याने भारतीय फलंदाजांना आपल्या गोलंदाजीच्या जाळ्यात अडकवून ठेवलं. त्याने आपल्या गोलंदाजीदरम्यान भारताच्या स्टार फलंदाजांना बाद केलं.

रबाडाने २०१४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. तो तिन्ही फॉरमॅटमध्ये संघाचा प्रमुख गोलंदाज आहे.

अशी राहिलीये कारकीर्द..

रबाडाच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने १०१ वनडे, ६० कसोटी आणि ५६ टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व केले आहे. कसोटी क्रिकेटमधील १०८ डावात गोलंदाजी करताना त्याने २८० गडी बाद केले आहेत. यादरम्यान ११२ धावा खर्च करत ७ गडी बाद ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

तर वनडे क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने ९ डावात २८.७७ च्या सरासरीने १५७ गडी बाद केले आहेत. यादरम्यान १६ धावा खर्च करत ६ गडी बाद ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे.

तर टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने ५६ सामन्यांमध्ये गोलंदाजी करताना ५८ गडी बाद केले आहेत. २० धावा खर्च करत ३ गडी बाद ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi Grand Finale: कोकण हार्टेड गर्ल बिग बॉसच्या घरातून बाहेर, प्रेक्षकांचे मानले आभार..

Chhagan Bhujbal : अजित पवार गटाचे बडे नेते पवार गटात जाणार; छगन भुजबळ यांनी सांगितलं विधानसभेत नेमकं गणित

SA vs IRE: दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का! तिसऱ्या वनडेतून स्टार खेळाडू बाहेर

Bigg Boss Marathi 5 च्या ग्रँड फिनालेला आर्याला नो एन्ट्री? काय आहे कारण? वाचा...

Bigg Boss Marathi Grand Finale : ग्रँड फिनालेमध्ये सूरजची झापुक झुपुक स्टाईल, पाहा Photo

SCROLL FOR NEXT