IND vs SA: भारताच्या मदतीला पुन्हा धावला विराट! अय्यरसोबत मिळून सावरला डाव

India vs South Africa, 1st Test: भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट्स पार्कमध्ये सुरु आहे.
virat kohli
virat kohliTwitter
Published On

India vs South Africa, 1st Test Live Score:

भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट्स पार्कमध्ये सुरु आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकली असून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं आहे. दरम्यान या सामन्यातील पहिल्या सत्रात दोन्ही संघांमध्ये बरोबरीची लढत पाहायला मिळाली आहे.

दक्षिण आफ्रिकेने जिंकली नाणेफेक..

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरला आहे.

दक्षिण आफ्रिकेची दमदार सुरुवात...

या डावात भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल ही जोडी मैदानावर आली होती. दोघांनी सुरुवातीचे ५ षटक अप्रतिम फलंदाजी केली. मात्र पाचव्या षटकात भारतीय संघाला मोठा धक्का बसला. (Latest sports updates)

virat kohli
IND vs SA: आर अश्विन की शार्दुल ठाकुर; प्लेइंग ११ मध्ये कोणाला मिळणार स्थान? दिग्गज खेळाडूने सांगितलं नाव

रोहित शर्मा अवघ्या ५ धावा करत माघारी परतला. तर यशस्वी जयस्वाल १७ धावा करत माघारी परतला. ही जोडी स्वस्तात माघारी परतल्यानंतर शुभमन गिलकडून संयमी खेळीची अपेक्षा होती. मात्र तो अवघ्या २ धावांवर चुकीचा शॉट खेळत बाद झाला. अवघ्या ३५ धावांवर भारताचे ३ फलंदाज माघारी परतला.

विराट कोहलीने या डावात एक बाजू धरुन ठेवली आहे. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर विराट कोहली ४७ चेंडूत ३३ धावांवर नाबाद आहे. तर श्रेयस अय्यर ३१ धावांवर नाबाद आहे. भारतीय संघाने २६ षटकअखेर ३ गडी बाद ९१ धावा केल्या आहेत.

virat kohli
Ind vs Sa,1st Test: रबाडासमोर रोहितला होतं तरी काय? पुन्हा तीच चूक करत झाला बाद;Video

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com