Ind vs Sa,1st Test: रबाडासमोर रोहितला होतं तरी काय? पुन्हा तीच चूक करत झाला बाद;Video

Rohit Sharma Wicket Video: या सामन्यातही रोहित शर्मा चुकीचा शॉट खेळत माघारी परतला आहे. यावेळीही त्याला कगिसो रबाडाने बाद केलं आहे.
rohit sharma wicket
rohit sharma wickettwitter
Published On

Kagiso Rabada Took Wicket Of Rohit Sharma:

भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्याला जोरदार प्रारंभ झाला आहे. या मालिकेतील पहिला सामना सेंच्चुरियनच्या सुपरस्पोर्ट्स पार्कवर सुरु आहे.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावूमाने नाणेफेक जिंकू प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. भारतीय कर्णधार रोहित शर्माला स्वस्तात बाद करत माघारी धाडलं आहे.

रोहित शर्मा वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील फायनलनंतर पहिल्यांदाच फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० आणि वनडे मालिकेतून त्याला विश्रांती देण्यात आली होती. असं वाटलं होतं की,कमबॅक सामन्यात रोहित मोठी खेळी करेल. मात्र असं काहीच झालं नाही. रोहित अवघ्या ५ धावा करत तंबूत परतला आहे.

rohit sharma wicket
Ind vs Sa, 1st Test: भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेत मोडले जाणार हे मोठे रेकॉर्ड्स

एक चुक रोहितला पडली महागात..

रोहित इतका परफेक्ट पुल शॉट जगातील कुठलाच फलंदाज खेळू शकत नाही. मात्र दक्षिण आफ्रिकेने रोहितच्या मजबूत पक्षावर वार करत सापळा रचला आणि त्याला बाद करत माघारी धाडलं. तर झाले असे की, भारतीय संघाची फलंदाजी सुरु असताना दक्षिण आफ्रिकेकडून ५ वे षटक टाकण्यासाठी कगिसो रबाडा गोलंदाजी करण्यासाठी आला.

या षटकातील शेवटचा चेंडू रबाडाने शॉर्ट टाकला. या चेंडूवर रोहितने पुल शॉट मारला. मात्र त्याचा अंदाज चुकला. कारण बाऊंड्री लाईनवर बर्गरने झेल टीपला. वनडे क्रिकेटमध्ये आक्रमक फलंदाजी करणाऱ्या रोहितने कसोटीतही आक्रमक पवित्रा घेतला. मात्र त्याची ही चूक महागात पडली आहे. (Latest sports updates)

rohit sharma wicket
IND vs SA: बॉक्सिंग डे कसोटीत यजमानांचा टॉस जिंकत बॉलिंगचा निर्णय! टीम इंडियाच्या प्लेइंग ११ मधून प्रमुख गोलंदाज बाहेर

रबाडाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद..

रोहितला बाद करताच कगिसो रबाडाच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. रबाडाने रोहितला सर्वाधिक १३ वेळेस बाद केलं आहे. असा कारनामा जगातील कुठलाच गोलंदाज करु शकलेला नाही. टीम साऊदीने रोहितला १२, अँजेलो मॅथ्यूजने १० आणि नाथन लायनने ८ वेळेस बाद केलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com