IND vs SA: आर अश्विन की शार्दुल ठाकुर; प्लेइंग ११ मध्ये कोणाला मिळणार स्थान? दिग्गज खेळाडूने सांगितलं नाव

India vs South Africa 1st Test Playing 11 Prediction: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या सामन्यात भारतीय संघाची प्लेइंग ११ कशी असेल? रोहितसोबत डावाची सुरुवात कोण करणार, आर अश्विन की शार्दुल ठाकूर?
Team india
Team indiagoogle
Published On

Harbhajan Singh Playing 11 Prediction:

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या सामन्यात भारतीय संघाची प्लेइंग ११ कशी असेल? रोहितसोबत डावाची सुरुवात कोण करणार, आर अश्विन की शार्दुल ठाकूर? दोघांपैकी कोणाला स्थान मिळणार असे काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग याने आर अश्विन आणि शार्दुल ठाकूर पैकी कोणाला स्थान मिळणार याचं कोडं सोडवलं आहे.

हरभजन सिंगच्या मते, शार्दुल ठाकूरऐवजी आर अश्विनला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिले जाऊ शकते. कारण दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज फिरकी गोलंदाजांविरुद्ध फलंदाजी करताना गोत्यात येऊ शकतात.

आर अश्विनला संधी का मिळायला हवी?

दक्षिण आफ्रिकेत वेगवान गोलंदाजांना भरपूर मदत मिळते. त्यामुळे भारतीय संघ जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा या तेज तर्रार गोलंदाजी आक्रमणासोबत मैदानात उतरणार आहे. यासह शार्दुल ठाकूरचा देखील प्लेइंग ११ मध्ये समावेश केला जाईल अशी चर्चा सुरू आहे. हरभजन सिंगचं म्हणणं आहे की, जर भारतीय संघात रविंद्र जडेजा आणि आर अश्विन ही फिरकी जोडी असेल तर दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज अडचणीत येऊ शकतात. (Latest sports updates)

Team india
IND vs SA: पराभवाची मालिका थांबणार का? ३१ वर्षांची प्रतिक्षा संपवण्यासाठी टीम इंडिया मैदानात;पाहा हेड टू हेड रेकॉर्ड

भारतीय संघात सातव्या क्रमांकावर रविंद्र जडेजा खेळणार हे फिक्स आहे. पण आठव्या क्रमांकाचं काय? यावर बोलताना हरभजन सिंग म्हणाला की, मला वाटतं आर अश्विन हा परफेक्ट ऑप्शन आहे. कारण त्यानंतर नवव्या क्रमांकावर जसप्रीत बुमराह असेल. हरभजन सिंगने हे वक्तव्य आपल्या युट्यूब चॅनेलवर केलं आहे. यासह दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या पाहिली कसोटीसाठी भारतीय संघाची प्लेइंग ११ कशी असेल याबाबतही भाष्य केलं आहे.

Team india
IND vs SA, 1st Test Live Streaming: आजपासून रंगणार 'बॉक्सिंग डे' कसोटीचा थरार! इथे पाहा फुकटात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com