IND vs SA 1st Test Live Score, Day-3: पहिला कसोटी सामना जिंकण्यासाठी भारतासमोर १२४ धावांचे आव्हान मिळाले आहे. दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव १५३ धावांत संपुष्टात आला. भारताने पहिल्या डावात ३० धावांची आघाडी घेतली होती. भारताला विजयासाठी आता १२४ धावांच गरज आहे. दक्षिण आफ्रिकेकडून कर्णधार टेम्बा बवुमा याने शानदार फलंदाजी करत अर्धशतक ठोकले. भारतीय संघाला चौथ्या डावात संयमी फलंदाजी करावी लागणार आहे. (India vs South Africa 1st Test Day 3 scorecard and highlights)
पहिल्या डावात फलंदाजी करताना कर्णधार शुभमन गिल दुखापतग्रस्त झाला आहे. तो कोलकाता कसोटीत फलंदाजी करणार नसल्याचे बीसीसीआयकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे भारतीय संघाला १० फलंदाजासहच मैदानात उतरावे लागणार आहे. त्यातच पहिल्याच षटकात भारताला मोठा धक्का बसला आहे. सलामी फलंदाज यशस्वी जायस्वाल एकही धाव न काढता बाद झाला आहे. भारतीय संघाची सर्व मदार अनुभव पंत आणि जाडेजा यांच्यावर असेल.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात फक्त १५९ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल भारताने पहिल्या डावात १८९ धावा केल्या. दुसऱ्या डावातही भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा केला. दक्षिण आफ्रिकेचा संघ १५३ धावांत संपुष्टात आला. रवींद्र जडेजाने एडेन मार्कराम (४ धावा), वियान मुल्डर (११ धावा), टोनी डी झोर्झी (२ धावा) आणि ट्रिस्टन स्टब्स (५ धावा) यांना बाद करून आफ्रिकन संघाचे कंबरडे मोडले. कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांनीही जडेजाला उत्तम साथ दिली. कर्णधार बावुमाने कॉर्बिन बॉश (२५) याच्यासोबत आठव्या विकेटसाठी ४४ धावांची भागीदारी केली. मोहम्मद सिराजने शेवटच्या दोन विकेट घेत आफ्रिकेचा डाव गुंडाळला. बावुमाने १३६ चेंडूत ५५ धावा केल्या.nck90
दक्षिण आफ्रिकेच्या १२४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरूवात अतिशय खराब झाली आहे. स्फोटक फलंदाज यशस्वी जायस्वाल खातेही न उघडता बाद झाला. तर अनुभवी केएल राहुल याला फक्त एकच धाव काढता आली. मार्को यान्सन याने दोन्ही सलामी फलंदाजांना तंबूत धाडले आहे. भारताने ५ धावांच्या मोबदल्यात दोन विकेट गमावल्या आहेत. सध्या ध्रुव जुरेल आणि वॉशिंग्टन सुंदर मैदानावर आहेत. भारतीय संघाला संयमी फलंदाजी करावी लागणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.