RSS नेत्याच्या मुलाची निर्घृण हत्या, बाजारात धाडधाड गोळ्या झाडल्या

Who killed RSS leader Baldev Raj Arora’s son Naveen? : पंजाबमधील फिरोजपूर शहरात आरएसएस नेते बलदेव राज अरोरा यांच्या मुलाची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या करण्यात आली.
Punjab daylight murder
Punjab daylight murder
Published On
Summary
  • फिरोजपूरमध्ये नवीन अरोरा यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

  • दोन हल्लेखोर दुचाकीवरून येत दिवसाढवळ्या बाजारात फायरिंग करून पसार झाले.

  • नवीन अरोरांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

  • पोलिसांनी गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही फुटेज व स्थानिकांच्या जबाबांच्या आधारे तपासाला वेग दिला आहे.

Punjab daylight murder details in Ferozepur : पंजाबमध्ये आरएसएस नेत्याच्या मुलाची दिवसाढवळ्या हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी सायंकाळी दोन हल्लेखोरांनी दुचाकीवर येत बंदुकीतून धाडधाड गोळ्या झाडल्या. मृत तरूणाचे नाव नवीन अरोरा असे आहे. पंजाबमधील फिरोजपूर शहरात बँकेच्या समोरच बाजारात अरोरावर गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटानस्थळी धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास करण्यात येत आहे.

पंजाबमधील फिरोजपूरचे ज्येष्ठ आरएसएस कार्यकर्ता बलदेव राज अरोरा यांचा मुलगा नवीन यांची शनिवारी हत्या करण्यात आली. फिरोजपुर शहरातील यूको बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जवळ दोन जणांनी दुचाकीवरून अरोरा यांच्यावर गोळ्या झाडल्या. नवीन कुमार यांना उपचारासाठी तात्काळ जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारावेळी त्यांचे निझन झाले. नवीन अरोर यांच्या डोक्यात गोळी लागली होती. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता, डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले पण उपचारावेळी त्यांनी जीव सोडला.

Punjab daylight murder
Delhi car blast : डॉक्टरांच्या दहशतवादी जाळ्यावर NIA चा छापा, सहा राज्यांमध्ये तपास, धक्कादायक माहिती उघड

या घटनेनंतर फिरोजपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळावर पंचनामा केला आहे. पोलिासांनी अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. तपास वेगात केला जात असून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. परिसरात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे, दुकानदाराचे जबाब घेतले जात आहेत. नवीन याचे आधी कुणाबरोबर वैर होते का? याचाही तपास केला जात आहे.

Punjab daylight murder
Bihar CM Name : नितीशकुमारांवर भाजपची सावध भूमिका, बिहारमध्ये मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स

शनिवारी बलदेव राज यांनी मुलगा नवीन अरोरा याला दुकानातून घराकडे पाठवले होते. तो दुकानापासून स्टेट बँक ऑफ इंडियाजवळ आला होता. त्याचवेळी दुचाकीवर दोन जण आले अन् त्यांनी धाडधाड नवीन यांच्यावर फायरिंग केले. यातील एक गोळी नवीन यांच्या डोक्यावर लागली. या घटनेनंतर पंजाबमध्ये राजकीय खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत तपास सुरू केला आहे. परिसरात असणाऱ्यांचे जबाब नोंदवले असून आरोपींचा शोध घेतला जातोय.

Punjab daylight murder
Pune : पुण्यात अटक केलेल्या झुबेरचं पाकिस्तान कनेक्शन, लॅपटॉपमध्ये भरमसाठ डेटा, हादरवणारी माहिती समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com