Pune : पुण्यात अटक केलेल्या झुबेरचं पाकिस्तान कनेक्शन, लॅपटॉपमध्ये भरमसाठ डेटा, हादरवणारी माहिती समोर

Pune Terror Suspect Zubair : पुण्यात अटक केलेल्या झुबेर हंगरगेकरच्या मोबाईलमध्ये पाकिस्तानसह आखाती देशांचे नंबर मिळाले असून एटीएसला लॅपटॉपमधून १ टीबीपेक्षा अधिक डेटा मिळाला आहे.
Pune Terror Suspect Zubair
Pune Terror Suspect Zubair
Published On
Summary
  • पुण्यात अटक केलेल्या झुबेर हंगरगेकरच्या मोबाईलमध्ये पाकिस्तानसह ५ आंतरराष्ट्रीय नंबर आढळले.

  • एटीएसने त्याच्या लॅपटॉपमधून १ टीबीपेक्षा अधिक डेटा जप्त केला.

  • झुबेरवर AQIS संघटनेसाठी जिहाद प्रचार केल्याचा आरोप आहे.

  • विशेष न्यायालयाने पोलिस कोठडीचा हक्क अबाधित ठेवतन्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

Zubair Hungergekar Pakistan link details : पुण्यातून अटक केलेल्या संशयित दहशतवादी झुबेर हंगरगेकर याच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये पाकिस्तानचा नंबर मिळाला आहे. त्यानंतर पुणे पोलिसांत एकच खळबळ उडाली असून चौकशीची चक्रे आणखी वेगाने फिरली आहे. महाराष्ट्र एटीएसने जुबेर याला पुण्यातून बेड्या ठोकल्या होत्या. त्याची कसून चौकशी सुरू असून लॅपटॉपमध्येही मोठा डेटा मिळाला आहे. जुबेर याचे दिल्ली स्फोटाशी कनेक्शन आहे का? याचाही तपास केला जात आहे.

झुबेर हंगरगेकर याच्या मोबाईलमधील कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये ५ आंतरराष्ट्रीय क्रमांक एटीएसला मिळाले आहेत. त्याच्या जुन्या आणि सध्या वापरत असलेल्या हँडसेटमध्ये आखाती देशातील नंबर मिळाले आहेत. जुन्या हँडसेट मध्ये १ नंबर पाकिस्तान, २ नंबर सौदी अरेबिया, १ नंबर ओमान आणि १ नंबर कुवेतचा आहे. तर वापरत असलेल्या मोबाईलमध्ये १ ओमान आणि ४ सौदी अरेबियाचे नंबर सेव्ह असल्याचे तपासात समोर आले आहे. या नंबर बाबत चौकशी केली असता माहीत नसल्याचं हंगरगेकरने उत्तर दिले आहे.

Pune Terror Suspect Zubair
IND vs PAK : महामुकाबला! भारत-पाकिस्तानमध्ये आज अटीतटीची लढत, कधी कुठे पाहाल सामना?

संशयित दहशतवादी जुबेर हंगरगेकर याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. अल कायदा इन इंडियन सबकाँटिनेन्ट (एक्यूआयएस) या दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ जिहादचा प्रसार-प्रचार करून देशाच्या एकता व सुरक्षिततेला धोका निर्माण केल्याच्या आरोपावरून जुबेर इलियास हंगरगेकर अटक करण्यात आली होती.

Pune Terror Suspect Zubair
Accident : सोनभद्रच्या खाणीत मोठी दुर्घटना, २ जणांचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली १५ जण गाडल्याची भीती

लॅपटॉपमध्ये भरमसाठ डेटा

संशयित दहशतवादी जुबेर हंगरगेकर याच्या लॅपटॉपमध्ये १ टीबी पेक्षा अधिक डेटा मिळाला आहे. त्याच्या लॅपटॉप आणि मोबाईलमधील आक्षेपार्ह फाइल्सची तपासणी एटीएसकडून कऱण्यात येत आहे. लॅपटॉप मधील फाईल्सच्या विश्लेषणातून सबळ पुरावे गोळा करण्याचे काम करण्यात येत आहे. अल कायदा या जागतिक दहशतवादी संघटनेसाठी काम करत असलेल्या जुबेर हंगरगेकरची रवानगी विशेष न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत केली. न्यायालयाने जुबेरच्या पोलिस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केलीय.

Pune Terror Suspect Zubair
Local Body Election : राजकीय कोलांटउड्या! ५ वर्षात पाचवा पक्ष, माजी आमदाराने सोडली शिंदेंची साथ, आता भाजपात दाखल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com