Rohit sharma 
क्रीडा

IND vs SA 1st Test: हिटमॅन रोहितचा फ्लॉप शो; तब्बल सातव्यांदा बनला रबाडाचा शिकार

Bharat Jadhav

Kagiso Rabada get Rohit Sharma wicket seven time :

सेंच्युरियन कसोटी सामन्यात भारतीय संघाचा दारूण पराभव झाला. दुसऱ्या डावात भारताच्या फलंदाजीची कामगिरी खराब झाली. दक्षिण आफ्रिकेच्या ४०८ धावांचे आव्हान पूर्ण करताना भारतीय संघाचा ३२ धावांनी पराभव झाला. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा पहिल्या कसोटी सामन्यात पूर्णपणे फ्लॉप ठरला. (Latest News)

सेंच्युरियन (Centurion) येथे भारत (India) आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघात पहिला कसोटी सामना (Test match)झाला. या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा (Team India)तिसऱ्या दिवशीच पराभव झाला. दक्षिण आफ्रिकेने ३२ धावांनी भारताचा पराभव केला. या पराभवाने दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचे भारतीय संघाचे स्वप्न भंगलं. भारतीय संघ दुसऱ्या डावात अवघ्या १३१ धावांत गारद झाला.

आफ्रिकेने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही ठिकाणी चमकदार कामगिरी केली. याउलट टीम इंडिया प्रत्येक ठिकाणी सपशेल अपयशी ठरली. यात सर्वात जास्त चर्चा होतेय रबाडा आणि रोहित शर्मातील झुंजीची. रोहित शर्मासाठी रबाडा जानीदुश्मन झालाय. रबाडाने सातवेळा रोहितला आपला शिकार बनवलाय. जगभरातील गोलंदाजांना घाम फोडणाऱ्या रोहित शर्माकडे रबाडाच्या भेदक माऱ्याचा उत्तर नाही. रोहित शर्मा त्याच्या गोलंदाजीपुढे नेहमी गटांगळ्या खाताना दिसतो.

आजच्या सामन्यातही कगिसो रबाडाने त्याला परत एकदा आपला शिकार बनवला. आजच्या सामन्यातील विकेट पकडून रबाडाने त्याला तब्बल सातवेळा बाद केलं आहे. २०१९ मध्ये रबाडाचा सामना करताना रोहितला अडचण निर्माण झाली होती. चार वर्षांनंतर परत रोहितच्या समोर रबाडा होता, यावेळीही रोहित टिकू शकला नाही. दोन्ही डावात तो बाद झाला. यावेळी रोहित शर्माला खातेही उघडता आले नाही. सर्व फॉरमॅटचा विचार करता रबाडाने सातव्यांदा रोहित शर्माला आपला बळी बनवला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Subhadra Yojana: महिलांना मिळणार १०,००० रुपये; काय आहे सुभद्रा योजना?

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

iPhone 16 Sale Video : iPhone 16 च्या खरेदीसाठी अॅपल स्टोअर बाहेर झुंबड; बघा Video

Maharashtra Politics: काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या, कुणाला मोठा भाऊ खुमखुमी असेल तर... ठाकरे गटाचा इशारा

Mumbai Crime: मुंबईत १३ वर्षीय मुलावर शौचालयात लैंगिक अत्याचार; मुलुंड परिसरातील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT