Ind Vs Pak ticket price in champions trophy 2025 Saam Tv
Sports

Ind Vs Pak : भारत-पाकिस्तान मॅचची खतरनाक क्रेझ, एक तिकीट ४ ते ५ लाख रुपयांना; आताही तिकीट मिळणार का?

Champions trophy 2025 Ind Vs Pak : १९ फेब्रुवारी रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवार होणार आहे. लगेचच रविवारी २३ फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तान यांची टक्कर होणार आहे. चाहत्यांना या सामन्याची खूप आतुरता आहे.

Yash Shirke

Ind Vs Pak Match Tickets : चॅम्पियन्स ट्रॉफीला अवघ्या दोन दिवसांमध्ये सुरुवात होणार आहे. रविवारी २३ फेब्रुवारी रोजी दुबईमध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ आमने-सामने येणार आहेत. हा महासंग्राम पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये खूप आतुरता आहे. या सामन्याच्या तिकीटांची विक्री काही क्षणात झाली. दरम्यान या सामन्याच्या तिकीटांचा काळाबाजार होत असल्याचे म्हटले जात आहे. एका रिपोर्टनुसार, सामन्याची तिकीटे ४ ते ५ लाख रुपयांना विकली गेली आहेत.

न्यूज ९ हिंदीने दिलेल्या माहितीनुसार, भारत-पाकिस्तान सामना पाहणाऱ्या लोकांकडून होणाऱ्या मागणीमुळे काळ्या बाजारातील बहुतांश तिकीटांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. एका वेबसाईटवर दुबईच्या ग्रँड लाउंजच्या तिकीटाची किंमत ४ लाख २९ हजार रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. तर मैदानातील चांगला व्ह्यू असलेल्या सीटच्या तिकीटाची किंमत जवळपास ५ लाख रुपयांच्या घरात पोहोचली आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामने पाहायला नेहमीच लोकांची गर्दी होते. मागच्या वर्षी २०२४ मध्ये टी-२० वर्ल्डकपमध्ये काळाबाजारामध्ये भारत आणि पाकिस्तान सामन्याच्या तिकीटाची किंमत १६ लाख रुपयांपर्यंत पोहोचली होती. एका वृत्तांनुसार, त्या वेळेस एका तिकीटची किंमत १.८६ कोटीपर्यंत गेली होती.

भारत आणि पाकिस्तान एकमेकांच्या देशात दौरे करत नाही. मोठ्या स्पर्धांमध्ये फक्त हे संघ एकमेकांच्या समोर येतात. त्यामुळे हे सामने पाहण्याकरीता क्रिकेटच्या चाहत्यांची गर्दी होत असते. यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधल्या सामन्याबद्दलही चाहते उत्सुक आहेत. आता रविवारी होणारा हा सामना कधी सुरु होतोय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Disha Patani: दिशा पटानीचा 'सुपरबोल्ड' लूक; फोटोंनी उडवली झोप

Maharashtra Live News Update: जम्मू- कश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी, आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू

Mangal Gochar 2025: सप्टेंबर महिन्यात पालटणार 'या' राशींचं नशीब; मंगळाच्या गोचरने होणार लाभ

Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तारीख

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

SCROLL FOR NEXT