
No Indian flag in Gaddafi Stadium: भारत सरकारकडून टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाण्याची परवानगी मिळाली नाही. भारत सरकारच्या निर्णयानंतर आयसीसी टूर्नामेंटचं आयोजन हायब्रिड मॉडेलच्या आधारावर करण्यात आलं. या आधारावर टीम इंडिया दुबईत सामने खेळणार आहे. तर इतर संघ पाकिस्तानात खेळणार आहे.
भारतीय संघ टुर्नामेंटसाठी दुबईला पोहोचला आहे. टीम इंडियाने रविवारी प्रॅक्टिस सेशनमध्ये सहभाग नोंदवला. पाकिस्तानच्या गद्दाफी स्टेडियमध्ये चॅम्पियन ट्रॉफीच्या शुभारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं.
या चॅम्पियन ट्रॉफी कार्यक्रमात चाहत्यांनी एक गोष्ट नोटीस केली. गद्दाफी स्टेडियममध्ये सात झेंडे पाहायला मिळाले. त्यात भारताचा झेंडा नव्हता. पाकिस्तानसहित टूर्नामेंटमध्ये ८ संघांनी भाग नोंदवला आहे. या टुर्नामेंटमध्ये भारताचा झेंडा असायला हवा होता. मात्र, भारताचा झेंडा नसल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
चाहत्यांच्या म्हणण्यानुसार, बीसीसीआयने चॅम्पियन ट्रॉफीसाठी भारतीय संघाला पाकिस्तानात न पाठवण्याचा निर्णय घेतला. या ट्रॉफीच्या कार्यक्रमात भारताचा झेंडा फडकावण्यात आला नव्हता. त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यावर एकाने कमेंट करत म्हटलं की, कराचीत एकही भारताचा झेंडा नाही. भारत सरकारने सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत संघाला पाकिस्तानात पाठवलं नाही. पीसीबीने यामुळे भारताचा झेंडा हटवला. मात्र, इतर देशांचे झेंडे कायम ठेवले आहेत.
चॅम्पियन ट्रॉफीचा शुभारंभाचा कार्यक्रम १६ फेब्रुवारी रोजी लाहोर येथे झाला. या कार्यक्रमाला पाकिस्तानची २०१७ ची आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी जिंकणाऱ्या संघातील खेळाडू उपस्थित होते. यामध्ये सरफराज अहमद, मोहम्मद आमिर, अजहर अली, जुनैद खान, शादाब खान, इमाद वसीम, हसन अली, मोहम्मद हफीज आणि हारिस सोहेल सहभागी झाले होते. तसेच न्यूझीलंडचा गोंलदाज टीम साउदी आणि जेपी डुमिनी सहभागी झाला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.