भारत-पाकिस्तान सामना कोलंबोमध्ये रंगला
पाकिस्तानने टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली
भारतीय मधली फळी अपयशी ठरली
कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होतोय. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिले.मात्र भारतीय संघाची फलंदाजी खराब झाली. भारतीय संघाची मधली फळी अपयशी ठरली. भारतीय संघाने इशान किशनच्या तुफानी खेळाच्या जोरावर १७६ धावांचे आव्हान पाकिस्तान संघासमोर ठेवलं.
सलमान आघाने पहिले षटक टाकले आणि पहिल्याच षटकात अभिषेकला बाद केलं. अभिषेकला खातेही उघडता आले नाही. पण त्यानंतर इशान किशन आणि तिलक वर्मा यांनी संघाचा डाव सावरला. सहा षटकांनंतर भारताची धावसंख्या १ बाद ५२ होती. इशान किशनने फक्त २७ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केले. किशनच्या ७७ धावांच्या जोरावार भारतीय संघाने
अर्धशतकानंतर इशान किशनने फक्त षटकार आणि चौकार मारले. पण नवव्या षटकात भारताला आणखी एक धक्का बसला जेव्हा इशान किशन ४० चेंडूत ७७ धावा काढून बाद झाला. सॅम अयुबने त्याची विकेट घेतली. इशाने त्याच्या डावात १० चौकार आणि तीन षटकार मारले. १० षटकांनंतर भारताची धावसंख्या २-९२ होती.
त्यानंतर कर्णधार सूर्या आणि तिलक वर्मा यांनी एक मजबूत भागीदारी केली. १५ व्या षटकात भारताला तिसरा धक्का बसला. तिलक वर्मा २५ धावांवर बाद झाला. पुढच्याच चेंडूवर हार्दिकला सॅम अयुबने बाद केले. हार्दिकला त्याचे खाते उघडता आले नाही. १५ षटकांनंतर भारताची धावसंख्या ४ बाद १२७ होती.
त्यानंतर कर्णधार सूर्या आणि तिलक वर्मा यांनी एक मजबूत भागीदारी केली. १५ व्या षटकात भारताला तिसरा धक्का बसला. तिलक वर्मा २५ धावांवर बाद झाला. पुढच्याच चेंडूवर हार्दिकला सॅम अयुबने बाद केले. हार्दिकला त्याचे खाते उघडता आले नाही. १५ षटकांनंतर भारताची धावसंख्या ४ बाद १२७ होती. त्यावेळी १९व्या षटकात भारताला पाचवा धक्का कर्णधार सूर्यकुमार यादवच्या रुपाने मिळाला.
उस्मान तारिकनेच सूर्याला बाद केलं. सूर्याने ३२ धावा केल्या. विशेष म्हणजे उस्मान तारिकच्या गोलंदाजीवर फलंदाजी कशी करावी, याचा सराव सूर्यकुमारनं केली होता, परंतु अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्नावर सुर्याकुमारकडे उत्तर देता आले नसल्याचं दिसलं. शेवटच्या षटकात शिवम दुबे धावबाद झाला. दुबेने २७ धावा केल्या. तर रिंकू सिंगने ४ चेंडूत ११ धावा केल्या. याप्रकारे भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध ७ बाद १७५ धावा पूर्ण केल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.