Arshdeep Singh: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून अर्शदीप सिंगला का वगळलं? काय आहे कारण

India vs Pakistan: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून टीम इंडियाने अर्शदीप सिंगला का वगळलं? असा प्रश्न अनेकांना पडलाय. त्याचे कारण जाणून घेऊ.
India vs Pakistan:
Indian pacer Arshdeep Singh during a practice session ahead of the IND vs PAK T20 World Cup 2026 clash at R Premadasa Stadium.saam tv
Published On
Summary
  • पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अर्शदीप सिंग प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर

  • कुलदीप यादवला संधी देण्याचा निर्णय

  • संघसंतुलन आणि खेळपट्टी लक्षात घेऊन बदल

टी-२० वर्ल्ड कपच्या स्पर्धेत कोलंबोमध्ये भारत आणि पाकिस्तानचा सामना होतोय. यावेळी टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध त्यांचा प्लेइंग इलेव्हन मोठा बदल केला. ऐनवेळी करण्यात आलेल्या बदलामुळे अनेकांना धक्का बसलाय. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने टी-२०मधील भारताचा सर्वोत्तम गोलंदाज अर्शदीप सिंगला बाहेर बसवण्यात आलंय. अर्शदीप सिंगला वगळल्यानंतर, सोशल मीडियावरील चाहत्यांनी भारतीय संघ व्यवस्थापनावर टीका केली.

India vs Pakistan:
India vs Pakistan: भारत-पाकिस्तान सामन्याआधी टीम इंडियात मोठा बदल, Playing 11मधून धाकड गोलंदाज आऊट

काहींच्या मते, अर्शदीप सिंगला प्लेइंग इलेव्हनमध्येच राहायला हवे होते आणि रिंकू सिंगला वगळायला हवे होते, असं म्हटलंय. टीम इंडियाने अर्शदीप सिंगऐवजी कुलदीप यादवची निवड केली आहे. अशा बदल का करण्यात आलाय हे जाणून घेऊ.

अर्शदीप सिंगला का वगळण्यात आले?

अर्शदीप सिंगला वगळण्याचे मुख्य कारण कोलंबोची खेळपट्टी. कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियममधील २२ यार्डची पट्टी फिरकीपटूंना अनुकूल असल्याचे म्हटले जाते. कुलदीप यादवला संधी देण्याचे खरे कारण हेच होते. कुलदीप यादवने पाकिस्तानविरुद्ध सातत्याने चांगली कामगिरी केलीय.

पाकिस्तानविरुद्ध नऊ सामन्यांमध्ये त्याने २३ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पाच आणि एका सामन्यात चार विकेट घेतल्या आहेत. पाकिस्तानी फलंदाजांना कुलदीप यादवच्या चेंडूना फटका मारता येत नाही. म्हणूनच त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये घेण्यात आले आहे.

India vs Pakistan:
India vs Pakistan T20 WC 2026: टीम इंडियाची पाकड्यांना फुल टशन; सूर्याच्या स्वॅगने पाकिस्तानचा कर्णधार बुचकाळ्यात, मैदानात नेमकं काय घडलं? VIDEO

अर्शदीप सिंगने टी-२० क्रिकेटमध्ये कमालाची कामगिरी केली आहे. २०२६ च्या टी-२० विश्वचषकात त्याने दोन सामन्यात तीन विकेट्स घेतल्या. त्याने नामिबियाविरुद्ध एक आणि अमेरिकेविरुद्ध दोन विकेट्स घेतल्या आहेत. अर्शदीप सिंगने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १२१ विकेट्स घेतल्या आहेत. पॉवरप्ले गोलंदाजी करताना त्याला यश मिळते. यासह डेथ ओव्हर्समध्येही शानदार गोलंदाजी करतो. या दोन्ही सत्रात विकेट घेण्यात तो यशस्वी ठरतो. दरम्यान असे असूनही, अर्शदीप सिंगला वगळण्यात आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com