Ind Vs Pak x
Sports

Ind Vs Pak : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरही भारत-पाकिस्तान सामना होणार? पण कुठे आणि कधी?

India Vs Pakistan : काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढले होते. भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेटचे सामने खेळले जाऊ नये असे अनेकजण म्हणत होते.

Yash Shirke

Ind Vs Pak Match : भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ५ सप्टेंबरपासून आशिया कपला सुरुवात होणार आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आशिया कप स्पर्धेमध्ये आमनेसामने येणार असल्याचे म्हटले जात आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना होणार नाही अशा चर्चा रंगल्या होत्या. पण आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान तीनवेळा आमनेसामने येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, ७ सप्टेंबर रोजी आशिया कपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळला जाईल. तर १४ सप्टेंबर रोजी या संघांमध्ये दुसऱ्यांदा लढत होईल. आशिया कपला ५ सप्टेंबर रोजी सुरुवात होईल. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि यूएई असे सहा संघ सहभागी होतील. ही स्पर्धा एकूण १७ दिवस चालेल. २१ सप्टेंबर रोजी आशिया कपचा अंतिम सामना खेळला जाईल. जर दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचले, तर तिसऱ्यांदा ते आमनेसामने येतील.

आशिया कप टी-२० स्वरुपामध्ये खेळवला जाणार आहे. यात तीन-तीन संघांचे दोन गट तयार केले जातील. सहापैकी चार संघ सुपर फोरमध्ये पोहोचतील. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारत पाकिस्तान सामने होतील. याबाबत बीसीसीआयने अधिकृत माहिती दिलेली नाही. ते सामन्यांसाठी सरकारच्या परवानगीची वाट पाहत आहेत, असे म्हटले जात आहे.

काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा प्रत्युत्तर देताना भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. यामध्ये पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर पाकिस्तानने भारतावर ड्रोन हल्ले केले. भारताने ड्रोन हल्ले परतवून लावले. यादरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले. या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ क्रिकेटच्या मैदानावर परत एकत्र दिसणार नाही, असे म्हटले जात होते.

आशिया कपमध्ये भारताचा दबदबा राहिला आहे. आशिया कपच्या इतिहासात भारताने सर्वाधिक वेळा विजेतेपद मिळवले आहे. भारतीय संघ गतविजेता देखील आहे. भारताने श्रीलंकेच्या संघाने सहा वेळा आशिया कप जिंकला आहे. पाकिस्तानच्या संघाने दोनदा आशिया कप स्पर्धेची ट्रॉफी जिंकली आहे. आशिया कपसंबंधित अधिकृत माहिती लवकरच बीसीसीआयद्वारे शेअर केली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : लोणावळा रेल्वे मार्गावर १० दिवस ब्लॉक

Soft Puri Tips: पुऱ्या फुगत नाहीत, तळल्यावर लगेच तेलकट अन् चपट्या होतात? 1 पदार्थ वापरा, टम्म फुगतील पूऱ्या

Local Body Election : जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर पडणार, आज फैसला होणार?

Khandvi Recipe: नाश्त्याला झटपट बनवा गुजराती स्टाईल खांडवी, मिनिटात होईल फस्त

Kankavli Politics : आमदार निलेश राणे संदेश पारकरांच्या घरी, मंत्री उदय सामंत उपस्थित

SCROLL FOR NEXT