Asia Cup 2025 : दुबईच्या क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान हा महामुकाबला रंगला होता. या सामन्यामध्ये भारताने पाकिस्तानवर सहज विजय मिळवला आहे. भारताने ७ गडी राखत आणि २५ चेंडू शिल्लक सामना जिंकला आहे. यूएईनंतर पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर आशिया कपमधील ग्रुप एमध्ये भारताचा संघ वरच्या स्थानावर गेला आहे.
आजच्या (१४ सप्टेंबर) भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यामध्ये पाकिस्तान संघाचा कर्णधार सलमान अली आघाने टॉस जिंकला. त्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत भारताला प्रथम गोलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले. पाकिस्तानचा संघ १२७ धावांवर ऑलआउट झाला. १२८ धावांचे आव्हान भारतीय संघाने अवघ्या १५.५ ओव्हर्समध्ये गडी राखत पूर्ण केले.
पाकिस्तानकडून साहिबजादा फरहानने चांगली खेळी केली. त्याने ४० धावा केल्या. त्यानंतर शेवटच्या ओव्हर्समध्ये शाहीन शाह आफ्रिदीने १६ चेंडूत दमदार ३३ धावा करत पाकिस्तानचा डाव १२० धावांच्या पुढे नेला. या दोघांव्यतिरिक्त फखर जमानने १७ धावा आणि फहीम अश्रफ ११ धावा केल्या. भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक ३ गडी बाद केले. त्याच्यापाठोपाठ जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी २ विकेट्स, तर हार्दिक पंड्या आणि वरूण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी १ विकेट घेतल्या.
१२८ धावा गाठण्यासाठी भारताचा संघ मैदानात उतरला. अभिषेक शर्माने पहिल्याच दोन चेंडूत षटकार, चौकार मारत दमदार सुरुवात केली. १३ चेंडूत त्याने ३१ धावा केल्या. शुभमन गिल १० धावांवर बाद झाला. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी फलंदाजी सांभाळत खेळ पुढे नेला. पुढे तिलक वर्मा ३१ धावा करुन माघारी परतला. शिवम दुबेने सूर्याला साथ दिली. दोघांनी भारताचा विजय पक्का केला. सूर्यकुमार यादवने विजयी षटकार मारला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.