IND Vs PAK Suryakumar Yadav  x
Sports

IND Vs Pak : 11-0 ला रायव्हलरी म्हणत नाही... सूर्यकुमार यादवने पुन्हा एकदा पाकिस्तानची लाज काढली; VIDEO

Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवने पुन्हा एकदा पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. पुरुषांप्रमाणे महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात स्पर्धा नाहीये असे तो म्हणाला.

Yash Shirke
  • सूर्यकुमार यादवने महिला क्रिकेटमध्ये भारत-पाक सामना 11-0 असतानाही स्पर्धा नाही, असे स्पष्ट केले.

  • महिला क्रिकेट वर्ल्डकप 2025 मध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध सर्व 11 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.

  • सूर्याच्या वक्तव्यामुळे महिला संघाला प्रोत्साहन मिळाले आणि सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे.

IND Vs PAK Suryakumar Yadav : आशिया कप २०२५ मध्ये भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने भारत आणि पाकिस्तान यांच्यात स्पर्धा नसल्याचे वक्तव्य केले होते. आता महिला विश्वचषक सुरु असताना सूर्याने केलेल्या वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. भारताच्या महिला संघाची आणि पाकिस्तानच्या महिला संघाची स्पर्धा नाहीये, असे भारताच्या टी-२० संघाच्या कर्णधाराने म्हटले आहे.

ज्याप्रमाणे पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात स्पर्धा नाही. अगदी त्याचप्रमाणे महिलांच्या क्रिकेटमध्येही दोन्ही संघांमध्ये तुलना नाहीये. मी पुन्हा सांगतो, जेव्हा दोन्ही संघ जिंकत असतात तेव्हा अटीतटीची स्पर्धा असते, 11-0 ही स्पर्धा नाहीये, असे वक्तव्य सूर्यकुमार यादवने जिओहॉटस्टारवर म्हटले आहे.

महिला क्रिकेट वर्ल्डकप २०२५ मधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी सूर्याने महिला संघाला प्रोत्साहन दिले. तेव्हा सूर्या म्हणाला, 'मी पुन्हा एकदा सांगतो, जेव्हा दोन संघांमध्ये संघर्ष असतो, तेव्हा त्यांच्यामध्ये स्पर्धा असते. 11-0 ही स्पर्धा नव्हे. आमच्या महिला क्रिकेट संघाने चांगली कामगिरी केली, तर ही संख्या 12-0 अशी होईल. जर हेड-टू-हेड स्कोअर 6-6 किंवा 7-5 असेल, तर त्या स्पर्धा म्हणतात. 11-0 ला स्पर्धा म्हणत नाही.'

भारताच्या महिला क्रिकेट संघाने वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आजपर्यंत पाकिस्तान विरुद्धचा एकही सामना गमावला नाहीये. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ ११ वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यात आमनेसामने आले आहेत. प्रत्येक सामना भारताने जिंकला आहे. महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही भारतीय संघ पाकिस्तानवर वरचढ आहे. भारताने नेहमीच एकतर्फी विजय मिळवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: बीडमध्ये पुन्हा मुंडे विरूद्ध मुंडे? स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वबळाचा नारा?

World Cup 2025: महिला टीम इंडियाचा 'कबिर खान', लेकींचं स्वप्न साकार करणारा जादूगार

Maharashtra Live News Update: रोहा-रामराज मार्गे अलिबाग जाणाऱ्या मार्गावरील पूल तुटला

अवकाळीच्या मदतीवर अधिकाऱ्यांचा डल्ला, भ्रष्ट अधिका-यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही नाही सोडलं

व्होटी चोरीचा मुद्दा पप्पूपर्यंत पोहचला, राजकारणात आणखी किती पप्पू?

SCROLL FOR NEXT