

धाराशिवच्या कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी शिवारात गव्हाच्या शेतात अफूची लागवडीची घटना समोर आली आहे. यानंतर 15 लाख रुपये किंमतीची अफुची झाडे जप्त करण्यात आली आहे.
कल्याणनजीक इराणी वस्तीत पिंपरी चिंचवड क्राईम
ब्रांच आणि खडकपाडा पोलिसांची मोठी कारवाई
अनेक गुन्हयात फरार असलेल्या मोहंमद कंवर इराणी या सराईत चोरट्याला ठोकल्या बेड्या
आरोपीला केली फिल्मी स्टाईलने केली अटक
आरोपीच्या अटक करताना चोरट्यांच्या कुटुंबीयांनी केला पोलिसांवर हल्ला
संपूर्ण घटना सीसीटीव्ही कैद
महिलांसोबत पोलिसांची झाली जोरदार झटापटी
आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश
यवतमाळ येथील चित्रकार राहुल मनोहर गुल्हाने यांनी महाशिवरात्रीनिमित्ताने बेलपत्रावर महादेवाची कलाकृती साकारली आहे. महादेवाला प्रिय असलेल्या या बेलपत्रावर महादेव साकारल्यामुळे त्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले. या चित्राची उंची दोन इंच, लांबी एक इंच एवढी आहे. बेलाच्या पानावरील हे चित्र साकारायला 25 मिनिटांचा कालावधी लागला. चित्र काढण्यासाठी ऐक्रेलिक कलर चा उपयोग करण्यात आला आहे.
पुण्यातील मांजरीत बिबट्याची दहशत कायम असल्याचे पाहायला मिळत आहे
शेतकऱ्याच्या दारातील कुत्र्यावर हल्ला
समोरच्या बोनेट मधून कारमधून धूर निघाल्याने कारमधील प्रवासी बाहेर पडले मोठी दुर्घटना टळली
बोनेटच्या भागातून सुरू झालेल्या आगीने संपूर्ण कार आगीच्या कचाट्यात
अर्टिगा कारला आग लागतात येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम
यवतमाळच्या उमरखेड येथील स्नेहसंमेलनात पाकिस्तानी देशभक्तीगीतावर नृत्य करण्यात आल्याची घटना घडली होती. भाजप नेत्याच्या तक्रारीहून मुख्याध्यापक आणि एका शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. va
प्रवाशांच्या सुरक्षिततेशी खेळ करणाऱ्या प्रकारात मध्य रेल्वेच्या आरपीएफ पथकाने मोठी कारवाई केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते Sharad Pawar यांच्यावर पुण्यातील Ruby Hall Clinic येथे उपचार करण्यात आले. या उपचारानंतर खासदार Supriya Sule यांनी रुग्णालयातील डॉक्टरांचे मनापासून आभार मानले. रुबी हॉल क्लिनिकमधील नामांकित डॉक्टर Dr Abhijit Lodha यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आवश्यक उपचार केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय पथकाने योग्य ती काळजी घेतल्याची माहिती समोर आली आहे.उपचारानंतर सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर डॉक्टर अभिजीत लोढा यांच्यासोबतचा फोटो पोस्ट केला. तसेच कठीण काळात योग्य उपचार आणि सहकार्य केल्याबद्दल त्यांनी डॉक्टरांचे विशेष आभार व्यक्त केले.
भिवंडीत दोन चोरट्यांना केली अटक आहे. भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने २ सोनसाखळी चोरट्यांना अटक केली आहे. तर चोरट्यांविरुद्ध १८ हून अधिक गुन्हे असल्याची माहिती मिळाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांचे बंधू उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी रवाना.
शरद पवार यांना उद्या रुग्णालयातून मिळणार डिस्चार्ज
उद्या सकाळी ११ वाजता शरद पवार यांना रुग्णालयातून मिळणार डिस्चार्ज
शरद पवारांच्या प्रकृतीत उत्तम सुधारणा
खोकल्याचा त्रास झाल्यामुळे शरद पवार यांना केलं होतं रुबी हॉल क्लिनिक मध्ये दाखल
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दुर्मिळ पशुपक्ष्यांच्या तस्करीच्या अवयवाचा धक्कादायक प्रकार समोर
विद्यापीठाच्या झूलॉजी प्राणीशास्त्र विभागात दुर्मिळ पशुपक्ष्यांच्या अवयवाची तस्करी आरोप.
विद्यापीठातील म्युझियममध्ये ठेवलेल्या घुबडसह अनेक पक्षाची नखे, जादूटोनासाठी तस्करी झाल्याचा आरोप
म्युझियममधील दुर्मिळ पक्षाची, नखांची काळयाबाजारात विक्री झाल्याचा आरोप
पुरोगामी विद्यापीठात अंधश्रद्धा व तस्करी खपवून घेणार नाही
आंबेडकरी संघटना आक्रमक दिला आंदोलनाचा इशारा
कोल्हापूर जिल्ह्यातील वडकशिवाले इथं आज जागतिक रेडिओ दिनाच्या निमित्ताने जुन्या पण चालू अवस्थेतील रेडिओच प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. वडकशिवाले गावातील शरद पाटील यांनी या रेडिओचा संग्रह केला आहे. या प्रदर्शनामध्ये जवळपास 20 ते 25 जुने रेडिओ ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये 1950 पासून च्या रेडिओचा समावेश आहे... रेडिओ दिनाच्या निमित्ताने ग्रामीण भागात भरलेलं हे अनोखा प्रदर्शन सध्या वडकशिवाले आणि परिसरात चर्चेचा विषय ठरल आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये ज्या पुण्यातील कलाकार कट्ट्याचे कौतुक केलं होतं तोच कट्टा स्थलांतरित करण्यात यावा अशी मागणी भाजप चे नगरसेवक पुनीत जोशी यांनी केली आहे. पुण्यातील गुडलक चौकात असलेला हा कट्टा वाहतुकीची कोंडी होत असल्याच्या कारणावरून हा इतरत्र हलविण्याची मागणी भाजप ने केली आहे. भाजपच्याच नगरसेवकांनी महापालिका आयुक्तांना कलाकार कट्टा स्थलांतरित करण्यासंबंधी लेखी पत्र आहे. या कलाकार कट्ट्यावर अनेक कलाकार त्यांचे कॅनव्हास घेऊन चित्र रेखाटत असतात, वाद्यांचे सादरीकरण करणारे तरुण वादक आणि शॉपिंगला आलेले नागरिक येथे थांबतात. काही वेळा तर या कट्ट्यावर विविध राजकीय पक्षांनी आंदोलनं सुद्धा केली आहेत. अशातच हा कट्टा आता स्थलांतरित करावा अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.
महावितरणच्या विविध ग्राहकाभिमुख योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचविणे, वीज चोरी विरोधात वातावरण निर्मिती करणे, वीज ग्राहकांमध्ये वीजबिल वेळेत भरणे, स्मार्ट मीटरच्या अचूकतेबाबत जनजागृती निर्माण करणे, वीज अपघात टाळणे, तसेच महावितरणच्या कर्मचाऱ्यांमध्ये संघ भावना निर्माण होवून त्याचा फायदा वीज ग्राहकांना होईल या उद्देशाने अमरावती शहरासह महावितरणच्या ४२ विभाग-उपविभागात, दीर्घ पदयात्रा लॉंग मार्च काढण्यात आली.अमरावती शहरात सायन्स कोर मैदान येथून काढण्यात आलेल्या दीर्घ पदयात्रेचे नेतृत्व मुख्य अभियंता अशोक साळुंके यांनी केले.
रायगड जिल्हा परिषद, शिवसेना गटनेते पदी मानसी दळवी यांची निवड
जिल्हा परिषदेतील शिवसेनेच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या बैठकीत एकमुखी निर्णय
अलिबाग इथं पार पडली नवनिर्वाचित सदस्यांची बैठक
आमदार महेंद्र दळवी देखील बैठकीला उपस्थित
आज पुणे महापालिकेत पहिली सर्व साधारण सभा पार पडली ज्यामध्ये भाजपकडून आगामी स्थायी समितीच्या सदस्यांची निवड करण्यात आली. यामध्ये अनेक नवनिर्वाचित नगरसेवकांची यंदा या समितीच्या सदस्यपदी वर्णी लागली आहे. त्यामुळे आता महापालिकेत पुढील आठवड्यात पीठासन अधिकारीच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीच्या अध्यक्षाची निवड होणार आहे अशी माहिती भाजप चे नगरसेवक आणि स्थायीच्या अध्यक्षपदाच्या रेस मध्ये असणारे श्रीनाथ भिमाले यांनी दिली आहे. तसेच भाजपच्या स्वीकृत नगरसेवकांच्या बाबतीत सुद्धा लवकरच निर्णय घेतला जाईल अशी माहिती देण्यात आली.
बोईसर पूर्व येथील दांडी पाडा आणि लोखंडी पाडा परिसरात उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर महसूल विभागाने मोठी कारवाई केली आहे.पालघर महसूल विभाग यांच्या पथकाने ही कारवाई मोहीम राबवली असून तहसीलदार रमेश शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली सकाळपासून ही मोहीम सुरू करण्यात आली.महसूल विभागाच्या पथकासोबत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कारवाईदरम्यान काही व्यक्तींनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती तणावपूर्ण बनल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करणाऱ्या संबंधितांना ताब्यात घेतले.अनधिकृत बांधकामांविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून भविष्यातही अशी कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
धुळे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर भाजपने एक हाती सत्ता मिळवत धुळे महानगरपालिकेवर भाजपचा महापौर निवड झाली असता, आज महापौर आणि उपमहापौरांचा परग्रहण सोहळा राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पार पडला आहे,
शिवरात्री निमित्त बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर देवस्थानमध्ये तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यावर्षी मेहंदी थीम वर आधारित फुलांची आकर्षक सजावट मंदिराच्या गाभाऱ्यात करण्यात आली आहे. दरम्यान रविवारी पहाटे 4 ते सोमवार रात्री 9 पर्यंत मंदिर भाविकांसाठी खुल ठेवलं जाणार आहे. मंदिराचे गर्भगृह, सभा मंडप, उत्तर आणि पूर्व महाद्वार या ठिकाणी फुलांची आकर्षण सजावट केली जाणार आहे.सुरक्षेच्या दृष्टीने यादरम्यान व्हीआयपी दर्शन आणि गर्भगृह दर्शन बंद ठेवला जाणार आहे. प्रत्येक वर्षी प्रमाणे यंदा देखील उत्सवानिमित्त धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आला असून पालखी सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांनी दिली आहे
जालन्यातून बंजारा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला असून, त्यांनी थेट राज्य सरकारला इशारा दिलाय..उद्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पोहरादेवी दौऱ्यावर जात आहेत. मात्र, या दौऱ्यापूर्वीच जालन्यातील बंजारा समाजाने आपल्या मागण्यांसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. उद्याच्या सभेत मुख्यमंत्र्यांनी बंजारा समाजाला एसटी (ST) आरक्षणाच्या सवलती लागू करण्याची घोषणा करावी, अशी आग्रही मागणी समाजाकडून करण्यात येत आहे..तसेच उद्या सवलती लागू न झाल्यास राज्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील आंदोलकांनी दिलाय
अमरावती जिल्ह्यातील शेंदोळा खुर्द येथे नदीपात्रात आंढळला अज्ञात इसमाचा मृतदेह..
सूर्यगंगा नदी पात्रात अज्ञात इसमाचा मृतदेह शेतकऱ्यांना शेतात जाताना दिसला
प्राथमिक अंदाजानुसार मृतदेह ६ ते ७ दिवसांपूर्वीचा असण्याची शक्यता.
पाण्यातील प्राण्यांनी मृतदेह कुरतडल्यामुळे ओळख पटविणे कठीण.
माहिती मिळताच पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल.
पंचनामा करून मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढला असून शवविच्छेदनासाठी मृतदेह तिवसा उपजिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.
मृताची ओळख पटविने व पुढील तपास तिवसा पोलिस करत आहे..
मालाड पठाणवाडी परिसरातून चार बांगलादेशी नागरिकांना अटक
हे चारही बांगलादेशी नागरिक भारतात अवैधरित्या दाखल होऊन मुंबईच्या मालाड पठाणवाडी परिसरात काम शोधण्यासाठी आले होते
मालाड कुरार पोलिसांच्या ATC पथकाला त्यांच्या हद्दीत बांगलादेशी नागरिक काम शोधण्यासाठी येत असल्याचं गुप्त माहिती मिळाली होती
याच माहितीच्या अनुषंगाने कुरार पोलिसांच्या एटीसी पथकाने मालाड पठाणवाडी परिसरात धाड टाकून चार बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे.
हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या आंबिया बहर हंगामात यंदा केळी उत्पादक जळगाव जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे २७ हजारांहून अधिक अर्ज आल्यानंतर संशयास्पद क्षेत्राची उपग्रहाच्या साह्याने तपासणी करण्यात आली.त्यात ४४ हजार हेक्टरवर केळीपीकच आढळलेले नाही. या बनावट अर्जदारांचे विमा हप्त्यापोटीचे ३७ कोटी ४३ लाख रुपये जप्त करण्यात आले.तर राज्य सरकारचे १२३ कोटी ५३ लाख आणि केंद्राचे ९३ कोटी ५८ लाख रुपये वाचले आहेत. अन्य जिल्ह्यांतही अशा संशयास्पद अर्जाची तपासणी सुरू असल्याचे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
आयटी पार्क हिंजवडी मध्ये मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. मेट्रो स्टेशनच्या खाली काम सुरू असताना क्रेन मध्ये एक व्यक्ती अडकून बसल्याने हिंजवडी परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडीनिर्माण झाली आहे. क्रेन मध्ये अडकलेल्या कामगाराला काढण्यासाठी मेट्रो आणि स्थानिक प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. तसेच मेट्रो स्टेशन खालून जाणाऱ्या रस्त्याची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. त्यामुळे पुढील काही तास हिंजवडीमध्ये वाहतूक कोंडी कायम असणार आहे.
हिंगोलीच्या कळमनुरी शहरात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयात घुसून तिघांनी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे, राजू कांबळे असे वंचित बहुजन आघाडीच्या मारहाण झालेल्या पदाधिकाऱ्यांचे नाव असून या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण पसरले आहे दरम्यान मारहाण करणाऱ्या हल्लेखोरांच्या हातात शस्त्र असल्याचा आरोप राजू कांबळे यांनी केला असून पोलिसांनी तातडीने आरोपीला अटक करा अशी मागणी आता वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
गर्दीत धक्का लागल्याच्या वादातून बदलापूर रेल्वे स्थानकात दोन प्रवाशांची हाणामारी झाल्याची घटना घडलीय. बदलापूर स्थानकातून सीएसटीएमकडे जाणारी 7.33 ची लोकल स्थानकात आल्यानंतर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. यावेळी गर्दीमुळे प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागला आणि त्या रागातून दोघांमध्ये प्लॅटफॉर्म नंबर तीन वरच हाणामारी सुरू झाली. दरम्यान प्लॅटफॉर्मवर तैनात असलेल्या रेल्वे पोलिसांनी दोन्ही प्रवाशांना शांत करत हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पुढचा अनर्थ टाळला. बदलापूर स्थानकात दररोज सकाळच्या सुमारास लोकल ट्रेनला मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि त्यामुळे अनेकदा क्षुल्लक कारणांवरून प्रवाशांमध्ये वाद होतात.
आय टी कंपनीत काम करणाऱ्या युवकाने केली आत्महत्या
विरेंद्र सिन्हा असे आय टी मध्ये काम करणाऱ्या युवकाचे नाव
शिवदुर्गच्या टीमने 250 फूट खोल दरीतून मृतदेह शोधून वर काढला .
काल पहाटेच्या दरम्याने विरेंद्र सिन्हा वय ३२ राहणार पुण्यात बाणेर येथील एका आय टी कंपनीत कामाला होता त्याने आत्महत्या केल्याचा संशय होता..
काल सकाळी चारचाकी गाडी लायन्स पॉईंट येथे पार्क केलेली आढळली आणि त्याने येथूनच त्याच्या मित्रांना व पत्निला मेसेज व मेल द्वारे याबाबत पहाटेच कळवले असल्याचे समजले .
बीडच्या परळी वैजनाथ येथे आयोजित 'महा पशुधन एक्सपो' प्रदर्शनाने केवळ पशुधनाचे वैभवच नाही, तर राजकीय नेत्यांमधील दिलखुलास नातेही समोर आणले आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे एकाच व्यासपीठावर आले असता, त्यांच्यातील खुसखुशीत संवादाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
"अरे धनंजय, मला आधीच यायचं होतं!"
प्रदर्शनात आगमन झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी प्रदर्शनाची भव्यता पाहून धनंजय मुंडे यांच्याकडे कौतुक मिश्रित तक्रार केली. त्या म्हणाल्या, "अरे धनंजय, मला या प्रदर्शनाला खरं तर खूप आधीच यायचं होतं, पण आता योग आला." बहीण-भावामधील हा अनौपचारिक संवाद पाहून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
- शालेय बसमधील सात ते आठ विद्यार्थी जखमी
- जखमी विद्यार्थ्याना राजगुरुनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार दाखल करण्यात आले
- राजगुरूनगर येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलें स्कूल च्या बस ला अपघात
- बस चालकाच्या प्रसंगावधान मोठी दुर्घटना टळली
* भर रस्त्यात घडलेल्या घटनेनं नागरिकांची धावपळ
* आगीत गाडी जळून खाक
* चालकाने गाडी बाहेर उडी घेतल्याने सुदैवाने जीवित हानी नाही
* अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मिळवले आगीवर नियंत्रण..
- १६ जागांसाठी इच्छुकांची धावपळ वाढली, पक्षाच्या नेत्यांकडे लॉबिंग सुरू
- महापौरांच्या गटनेत्यासोबतच्या बैठकीनंतर राजकीय हालचालींना वेग
- पक्षनिहाय गणित स्पष्ट… पण कोणाला मिळणार संधी याकडं लक्ष
- नाशकात लॉबिंग, मोर्चेबांधणी आणि तगडी रस्सीखेच पाहायला मिळणार
- भाजप ९, शिंदेंच्या शिवसेना-मनसे ४, ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस २ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी १ असे एकूण १६ सदस्य निवडले जाणार
उल्हासनगर महानगरपालिकेने मालमत्ता कर थकविणाऱ्या धारकांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. महानगरपालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या आदेशानुसार करनिर्धारक अधिकारी नीलम कदम यांनी ही मोहीम हाती घेतली. अनेक दिवसांच्या सूचना देऊनही करोडो रुपयांचा मालमत्ता कर थकीत ठेवणाऱ्या मालमत्तांवर अखेर सीलची कारवाई करण्यात आली. कारवाईची धडक पाहता काही मालमत्ताधारकांनी तात्काळ थकीत रकमेचे धनादेश सादर केले. दररोज सुरू असलेल्या या कारवाईमुळे करचुकवेगिरी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. थकीत धारकांनी लवकरात लवकर कर भरून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन नीलम कदम यांनी केले आहे.
आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही
आगीचा भडका आणि धुराचे कल्लोळ आजूबाजूला मोठ्याप्रमाणात पसरले आहेत
स्थानिक सामाजिक कार्यकर्ते रजनीकांत म्हात्रे यांनी वसई विरार महापालिकेचे अग्निशमन दल माहिती देण्यात आली आहे
अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत
एम.ए., एम.कॉम., एम.टेक., एम.बी.ए. झालेले तरुणही पोलिस भरतीसाठी रांगेत उभे
८८ जागांसाठी तब्बल ६ हजार ८५३ अर्ज दाखल
आज पहाटेपासून पोलिस परेड ग्राऊंडवर मैदानी चाचणीला सुरुवात
३०० पोलिसांच्या बंदोबस्तात भरती प्रक्रिया सुरू
पुणे महापालिकेत विरोधीपक्ष नेते पद एक एक वर्षे देणार
पाच नगरसेवकाना मिळणार एक एक वर्षे विरोधी पक्ष नेते पद
तसेच स्थायी समिती सदस्य पद ही एक एक वर्षे देणार..
काल मुंबईत झालेल्या बैठकीत सुनेत्रा पवार यांनी घेतला निर्णय
महावितरण कंपनी कडून वीज बिलाचा नियमित भरणा करावा,स्मार्ट मीटर,विद्युत सुरक्षितता सोलर आणि विजेची बचत या विषयावर यवतमाळ शहरातून भव्य मिरवणूक काढून जनजागृती करण्यात आली यावेळी रॅलीने शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते. या रॅलीला अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली यांनी हिरवी झेंडी दाखवली दरम्यान अतिरिक्त कार्यकारी अभियंता मांगीलाल राठोड यांच्यासह मार्गदर्शनात शहरातील विविध चौकातून रॅली काढण्यात आली.
डोंबिवलीतील मानपाडा रस्त्यावरील कस्तुरी प्लाझा येथून दावडी गाव येथे जाण्यासाठी एका महिला आणि त्यांच्या नातेवाईकांनी रिक्षा निश्चित केली होती. चालकाने डोंबिवली ते दावडी प्रवासासाठी १२० रुपये भाडे सांगितले.दावडी येथे पोहोचल्यानंतर चालकाने अचानक ४० रुपये जादा मागत एकूण १६० रुपये घेतले. तक्रारदार महिलेने पैसे दिल्यानंतरही चालक संतप्त झाला. इतक्या आत आणायचे होते तर आधी का सांगितले नाही?असे म्हणत त्याने आरडाओरडा सुरू केला.तक्रारदार रिजा जोसेफ वय ६२वर्ष या मूळच्या विक्रोळी येथील रहिवासी असून त्यांनी दावडी भागातील घर भाड्याने दिले आहे. भाडेकराराच्या कागदपत्रांसाठी त्या सोमवारी कस्तुरी प्लाझा येथे आल्या होत्या. काम आटोपल्यानंतर त्या परत दावडी येथे जात असताना हा प्रकार घडला.आरडाओरडा ऐकून भाडेकरू लालती पटेल यांचा मुलगा वृषभ चालकाला समजावण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र चालकाने वृषभच्या गळ्यावर नखांनी ओरखडे काढत त्याला मारहाण केली. हा प्रकार पाहून जोसेफ वृषभच्या बचावासाठी मध्ये पडल्या असता संतप्त चालकाने त्यांना जोराचा धक्का दिला.धक्क्यामुळे त्या रस्त्यावर पडल्या आणि त्यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यांना तत्काळ दावडी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांनी हात फ्रॅक्चर झाल्याचे सांगितले.या घटनेनंतर पोलिसांनी रुग्णालयात जाऊन जोसेफ यांचा जबाब नोंदवला. चालकाविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.या घटनेमुळे डोंबिवलीत पुन्हा एकदा रिक्षा चालकांच्या मुजोरीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गौतमी गोदावरी नदीवरील बेटावर साकारली जाणार त्र्यंबकेश्वराची भव्य मूर्ती
६ एकर बेटावर साकारली जाणार त्र्यंबकेश्वराची धातूची भव्य मूर्ती, ६ एकरावर साकारलं जाणार पर्यटन बेट
तर काळाराम मंदिर, तपोवन, त्र्यंबकेश्वर मंदिर, चक्र तीर्थ, कपिलधारा तीर्थ अशी तब्बल १३५ किलोमीटरचा रामायण परिक्रमा तयार करण्याचा प्रस्ताव
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पंचधातूंचा कारखाना सुरू करणार
महिला बचत गटाच्या माध्यमातून पंचधातूंचा कारखाना सुरू केला जाणार
बीएमसीच्या जलवाहिनीतून बेकायदेशीर जोडणी करून पाणी चोरी करून विक्री करणाऱ्या टोळीवर पवई पोलिसांनी कारवाई करत दोन जणांना अटक केली. दिनेश कुमार कालूराम जयस्वार (56) आणि नितेश कुमार दिनेश जयस्वार (24, रा. मरोळ) अशी अटक आरोपींची नावे आहेत. मारवा रोड, अंधेरी पूर्व येथे छापा टाकून सुमारे 25 लाखांचा टँकर, इलेक्ट्रिक मोटार व पाईप साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 303(2) तसेच महानगरपालिका अधिनियम कलम 282, 284 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अश्पाक सय्यद हा आरोपी फरार असून पुढील तपास सुरू आहे.
शेती उत्पादनातील घट, बाजारातील दरकपात आणि वाढत्या आर्थिक तणावामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. राज्य शासनाकडून कर्जमाफीबाबत हालचाली सुरू असताना अमरावती विभागातील अमरावती,अकोला,वाशिम,बुलढाणा यवतमाळ या पाच जिल्ह्यांमधील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सुमारे 3 लाख ५५ हजार शेतकरी थकबाकीदार असल्याची माहिती समोर आली आहे. या शेतकऱ्यांकडे एकूण ३,७०० कोटी रुपयांहून अधिक पीककर्ज थकीत आहे.यापैकी सुमारे 2लाख 44 हजार शेतकऱ्यांची खाती अपलोड करण्यात आली असून उर्वरित शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. राष्ट्रीयकृत बँका आणि सहकारी संस्थांकडील थकबाकीदारांची संपूर्ण माहिती शासनाकडे जमा केली जात आहे.दरम्यान,राज्य शासनाने कर्जमाफीसाठी निकष निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू केली असून याबाबत निर्णय लवकरच अपेक्षित आहे.
बीडच्या परळी मध्ये मंत्री पंकजा मुंडे यांच्या खाते अंतर्गत असलेल्या पशुसंवर्धन विभागामार्फत परळी मध्ये महा पशुधन एक्सपो चे आज मंत्री पंकजा मुंडेंच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन होत असून भव्यदिव्य पशुधनाचे प्रदर्शन आज परळी मध्ये सुरू होत आहे यामध्ये पशु धना संदर्भात माहिती त्याचबरोबर विविध योजनांची माहिती या पशुसंवर्धनामध्ये आणि प्रदर्शनामध्ये देण्यात येणार आहे राज्यस्तरीय हे महा पशुधन एक्सपो एक्सपो आज परळी मध्ये राबवला जात असून या कार्यक्रमासाठी उद्या स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कार्यक्रमात उपस्थिती लावणार आहेत यामुळे कार्यक्रमाला आणखीनच रोषनाई येणार असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार घेणारा आज पुण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक
जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये निवडून आलेल्या उमेदवारांची घेणार भेट
काही वेळात उपमुख्यमंत्री सुनिता पवार सर्किट हाऊसला दाखल होणार
बारामती मधील त्याचबरोबर इतर पदाधिकारी सर्किट हाऊसला दाखल
जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीने खाती सत्ता आणली आहे या सर्व उमेदवारांची आज होणार बैठक
कांदा पिकामध्ये अफूची शेती करणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी
ठाकरे गटाचे वाशी उप तालुकाप्रमुख समाधान उघडे यांच्या शेतात 485 किलो उफुची झाडे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली जप्त
बेकायदेशीर कृत्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होवुन संघटनेच्या शिस्तीला धक्का बसल्याचा ठपका ठेवत पक्षातून केली हकालपट्टी ,उपजिल्हाप्रमुख प्रदीप मेटे यांनी अधिकृत पञक काढुन केली हकालपट्टी
पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार समाधान उघडे यांची पक्षातून हकालपट्टी केल्याची खासदार ओमराजे निंबाळकर यांची माहीती
बुलढाणा जिल्हा परिषदेच्या वतीने स्थानिक क्रीडा संकुल मैदानावर आयोजित तीन दिवसीय विभागीय मैदानी व सांस्कृतिक स्पर्धांचा शानदार शुभारंभ झाला. जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम आणि बुलढाणा या पाच जिल्हा परिषदांच्या कर्मचारी स्पर्धकांनी विविध विषयांवर जिवंत देखावे सादर करत रंगत वाढवली. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.....
लोणावळ्यातील टायगर पॉईंट वर एका 32 वर्षीय युवकाने आत्महत्या केली आहे. नेमकं आत्महत्येचे कारण काय हे समजू शकले नाही. वीरेंद्र सिंग वय 32 राहणार पुणे. असून तो बाणेरच्या एका आयटी कंपनीत कामाला होता . दरम्यान लाइन्स टायगर पॉईंट वर त्याची दुचाकी दिसून आली आहे. दरम्यान त्याने त्याच्या मित्राला मी आत्महत्या करतो असा एसएमएस आणि मेल पण केला . या घटनेची लोणावळा ग्रामीण पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी लोणावळा टायगर पॉईंट वर चौकशी करण्यास सुरुवात केली. शिवदुर्ग टीमला प्रचार करून जवळजवळ अडीचशे फूट दरीत त्याचा मृतदेह आढळला. मृतदेह बाहेर काढून पोस्टमार्टम साठी आल्यात पाठवण्यात आलेला आहे. अधिक तपास लोणावळा पोलीस करीत आहे.
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री रणजित देशमुख यांच्या विरुद्ध अटक वॅारंट जारी
धनादेश न वटल्याने न्यायाधीशांनी जारी केला अटक वॅारंट
धनादेश न वटवल्याच्या प्रकरणात वारंवार न्यायालयात हजर न राहिल्याने रणजीत देशमुख यांच्यासह तिघांविरुद्ध अटक वॅारंट जारी
याचिकाकर्ते अतुल देवगडे यांनी दाखल केली याचिका
११ लाख रुपयांचे पाच धनादेश देवगडे यांना देण्यात आले होते, त्यापैकी एकंही धनादेश वटला नाही
विहीरीत पडलेल्या पाच रानगव्यांना वनविभागाने सुखरुप बाहेर काढले
संगमेश्वरमधील संतोष खेडेकर यांच्या कोरड्या विहीरीत पडले होते रानगवे
जवळपास 20 फुट खोल विहीरीत पडले होते रानगवे
नर मादी आणि रानगव्यांची तीन होती पिल्लं पडली होती विहीरीत
वनविभागाला माहीती मिळताच तात्काळ टीम घटनास्थळी झाली दाखल
जेसीबीच्या सहाय्याने वाट तयार करुन या रानगव्यांना काढण्यात आले बाहेर
भिवंडी पालिका महापौर पदाची निवडणूक 20 फेब्रुवारी रोजी होणार
मागील कित्येक दिवसांपासून भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी मतदानाच्या प्रतीक्षेत होती.
महापौर व उपमहापौर पदासाठी 16 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 ते 5 या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वेळ आहे.
तर या पदांसाठी शुक्रवार 20 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता स्व.विलासराव देशमुख सभागृहात या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.
भाजपाकडून जिल्हा उपाध्यक्ष कैलास शिंदे यांच्यासाठी तयारी सुरु तर शिवसेनेकडून माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या कन्या आकांक्षा चौगुले यांच्यासाठी तगडी फिल्डिंग
सभापती पद सर्वसाधारण अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित असून भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांनी आपापली ताकद लावल्याचे चित्र
भुसणी गणातून कैलास शिंदे तर केसर जवळगा गणातून आकांक्षा चौगुले झाले आहेत विजयी
उमरगा पंचायत समितीची सदस्य संख्या १८ असून त्यात भाजप ७, शिवसेना ५, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) १, काँग्रेस ३, ठाकरे शिवसेना १ आणि अपक्ष १ असा अशी आहे.
महायुतीकडून अखेर सभापती पदाची संधी शिवसेनेला मिळणार की भाजपला याकडे लक्ष
हवामान अंदाजानुसार, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या आर्द्र वाऱ्यांमुळे जमिनीवर एक 'ट्रफ' (कमी दाबाचा पट्टा) तयार होत आहे. यामुळे १७ आणि १८ फेब्रुवारीच्या सुमारास महाराष्ट्रातील पुणे विभागासह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहून पावसाच्या हलक्या सरी कोसळू शकतात. जरी हा पाऊस मोठा नसला, तरी फेब्रुवारीतील हा बदल पिकांसाठी आणि वाढत्या तापमानासाठी महत्त्वाचा ठरेल.
जिल्हा नियोजन समितीच्या पुढील आर्थिक वर्षासाठी (2026 -27) १०३२ कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्याला उपमुख्यमंत्री व पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली लहान तुकड्यांमध्ये कामे न करता मोठे प्रकल्प राबविण्यावर भर द्यावा अति मागासने दुर्गम भागाच्या विकासावर विशेष लक्ष केंद्रित करून कामांची प्रशासकीय मान्यता निविदा प्रक्रिया आणि अंमलबजावणीसाठी कालमर्यादा निश्चित करून काम करावे अशा सूचना पवार यांनी प्रशासनाला दिल्या.
3000 वाहन चालकांचे परवाने रद्द...
रस्ते अपघातातील मृत्यू कमी करण्यासाठी बेशिस्तंवर कठोर कारवाई....
जिल्ह्यातील रस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी अपघात प्रवण भागांवर तातडीने उपाययोजना राबविण्यात येत असून बेसिस्त 3000 वाहन चालकांचे परवाने रद्द करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली....
तृतीयपंथी व्यक्ती (अधिकारांचे संरक्षण) कायदा २०१९ व नियम २०२० अंतर्गत केंद्र शासनाने तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र पोर्टल सुरू केले आहे.
या पोर्टलवर राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांक १४४२७ उपलब्ध करून देण्यात आला आहे.
या हेल्पलाइनद्वारे योजनांची माहिती, अर्ज प्रक्रियेचे मार्गदर्शन, विविध अडचणींचे निराकरण तसेच तक्रारी नोंदवण्याची सुविधा दिली जाणार आहे. तृतीयपंथीयांनी या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाजकल्याण सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा प्रारुप विकास आराखडा रद्द झाल्याने 23 गावे प्राधिकरणाच्या हद्दीतून वगळण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे या गावातील बांधकाम परवानगीचे अधिकार नियोजन प्राधिकरण म्हणून पुणे महानगरपालिकेत देण्याबाबत आदेश नगर विकास खात्याने काढला आहे.
त्यामुळे या गावांतील विकासाला आता चालला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पोलीस भरती प्रक्रिया निमित्त पाषाण रस्त्यावरील पुणे ग्रामीण पोलीस मुख्य परिसरात वाहतूक बदल करण्यात आले असून दररोज पहाटे चार ते सायंकाळी सहा या वेळेत अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत उमेदवारांची गर्दी लक्षात घेता 11 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी पर्यंत निर्बंध लागू केले आहेत. ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या आवारात पोलीस भरतीसाठी दररोज मोठ्या संख्येने उमेदवार येत आहेत.
व्हिडिओ कॉन्फरन्स रुममधून बाहेर जाण्यास सांगितल्याच्या रागातून कळंबा कारागृहातील दोन पोलिसांवर बंद्याने हल्ला केला. काल सकाळी साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी मोकातील आरोपी इम्रान शमशुद्दीन शेख याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. संभाजी बाबूराव कामले व विलास उत्तम पारसे, अशी जखमी पोलिसांची नावे आहेत. मोकातील आरोपी शेख वर्षभरापासून कळंबा कारागृहात आहे. आज त्याची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी होणार होती. साडेअकराच्या सुमारास तो सुनावणीसाठी कॉन्फरन्स खोलीसमोर आला. यावेळी इतर काही जणांची सुनावणी सुरू असल्याने त्याला थोडा वेळ थांबण्यास सांगण्यात आले होते. पण, याचा राग आल्याने शेखने पोलिस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. ड्युटीवर असलेले संभाजी कामले व विलास पारसे हे त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न करीत होते. पण, तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. यातूनच त्याने कामले यांना मारहाण सुरू केली. याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात इमरान शेख वर गुन्हा नोंद करण्यात आलाय.
नागपूर -
- नागपूर जिल्ह्यातील कुही आंभोरा मार्गाजवळील कल्पना जिनिंगच्या आवारातील कापसाला आग..
- काल सायंकाळी लागलेल्या या आगीत आठ वर्षीय बालक होरपळल्याने गंभीर जखमी,तर 18 हजार क्विंटल कापूस जळाल्याने जवळपास 12 कोटीचे नुकसान..
- रोहन सुरेश दूधवे असे होरपळकेल्या मुलाचे नाव, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज..
- रात्री उशिरापर्यंत अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.