
महिला विश्वचषक २०२५ स्पर्धा श्रीलंकेत सुरु.
भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने.
टॉस जिंकत पाकिस्तानचा गोलंदाजी करण्याचा निर्णय.
IND VS PAK Women's Cricket World Cup 2025 : श्रीलंकेमध्ये सध्या महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा सुरु आहे. आज (५ ऑक्टोबर) भारत आणि पाकिस्तान या दोन देशांचे महिलांचे संघ आमनेसामने आले आहे. हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जात आहे. भारत आणि पाकिस्तानचा हा स्पर्धेतील दुसरा सामना आहे. हा सामना कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सलग चौथ्यांदा रविवारी भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ आमनेसामने आले आहे. आशिया कप २०२५ मध्ये तीन वेळा हे संघ एकमेकांसमोर उभे ठाकले होते. १४ सप्टेंबर (ग्रुप स्टेज), २१ सप्टेंबर (सुपर ४) आणि २८ सप्टेंबर (फायनल) अशा ३ दिवशी भारत-पाकिस्तान लढत पाहायला मिळाली होती. आशिया कपमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानच्या संघाशी हस्तांदोलन म्हणजेच हँडशेक करण्याचे टाळले होते. महिला विश्वचषकातही भारताची महिला कर्णधार हरमनप्रीत कौरने पाकिस्तानच्या कर्णधार फातिमा सनाशी हस्तांदोलन केले नाही.
पाकिस्तानच्या महिला संघाची कर्णधार फातिमा सना खानने टॉस जिंकला. पाकिस्तान प्रथम गोलंदाजी करणार असल्याचे तिने सांगितले. त्यासोबत भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघांच्या प्लेईंग ११ मध्ये प्रत्येकी १-१ बदल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
भारताच्या महिला संघाची प्लेईंग ११ -
प्रतिका रावल, स्मृती मानधना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, रिचा घोष, स्नेह राणा, रेणुका सिंग ठाकूर, क्रांती गौड, श्री चरणी
पाकिस्तानच्या महिला संघाची प्लेईंग ११ -
मुनीबा अली, सदफ शमास, सिद्रा अमीन, रमीन शमीम, आलिया रियाझ, सिद्रा नवाज, फातिमा सना (कर्णधार), नतालिया परवेझ, डायना बेग, नशरा संधू, सादिया इक्बाल
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.