Virat Kohli Record: बांगलादेशला धूळ चारल्यानंतर भारतीय संघ आता न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली देखील ही मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. दरम्यान मैदानात उतरताच विराटला एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची संधी असणार आहे.
विराट कोहलीने आतापर्यंत अनेक मोठे रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना बंगळुरुतील एम चिन्नास्वामीच्या मैदानावर होणार आहे. दरम्यान या सामन्यात ५३ धावा करताच विराट, कसोटी क्रिकेटमध्ये ९००० धावा पूर्ण करणार आहे.
असा रेकॉर्ड करणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरेल. फॅब ४ फलंदाजांमध्ये केवळ जो रुट आणि स्टीव्ह स्मिथला हा कारनामा करता आला आहे. जो रुट तर सचिन तेंडुलकरच्या कसोटीत सर्वाधिक धावा करण्याच्या रेकॉर्डच्या अगदी जवळ पोहोचला आहे. रुटने आतापर्यंत १२६६४ धावा केल्या आहेत.
भारतीय संघाकडून सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सुनील गावसकर यांनाच कसोटी क्रिकेटमध्ये ९००० धावांचा पल्ला गाठता आला आहे. तर अवघ्या ५३ धावा करताच विराट देखील ९००० धावांचा पल्ला गाठणार आहे. असा रेकॉर्ड करणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरेल, तर वर्तमान क्रिकेटमधील तिसरा असा फलंदाज ठरेल त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ९००० धावा पूर्ण केल्या आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज
१- सचिन तेंडुलकर- १५९२१ धावा
२- राहुल द्रविड - १३२८८ धावा
३- सुनील गावसकर - १०१२२ धावा
४- विराट कोहली- ८९४७ धावा
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
१- सचिन तेंडुलकर - १५९२१ धावा
२- रिकी पाँटींग - १३३७८ धावा
३- जॅक कॅलिस- १३२८९ धावा
४- राहुल द्रविड- १३२८८ धावा
५- जो रुट- १२६६४ धावा
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.