IND vs NZ: भारत की न्यूझीलंड कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड

India vs New Zealand Test Record: भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे.
IND vs NZ: भारत की न्यूझीलंड कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड
indian cricket teamtwitter
Published On

भारत आणि बांगलादेश यांच्यातील टी -२० मालिका नुकतीच समाप्त झाली आहे. कसोटी मालिकेत २-० ने धूळ चारल्यानंतर टी -२० मालिकेतही भारतीय संघाने बांगलादेशचा सुपडा साफ केला. आता भारतीय संघासमोर न्यूझीलंडचं आव्हान असणार आहे. दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. दरम्यान कसा राहिलाय दोन्ही संघांचा रेकॉर्ड? जाणून घ्या.

भारत आणि न्यूझीलंडचा हेड टू हेड रेकॉर्ड

कसोटी क्रिकेटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळताना भारतीय संघाचं पारडं जड राहिलंय. आतापर्यंत दोन्ही संघ ३५ वेळेस आमनेसामने आले आहेत. यादरम्यान भारतीय संघाने २२ सामने जिंकले आहेत. तर न्यूझीलंडला १३ सामने जिंकता आलेत आहेत. तर २७ सामने ड्रॉ राहिले आहेत.

भारतात कसा राहिलाय रेकॉर्ड?

भारतात खेळताना भारतीय संघाचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे. २०१२ नंतर भारतीय संघाने भारतात खेळताना एकही मालिका गमावलेली नाही. भारतात खेळताना भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध १७ कसोटी सामने जिंकले आहेत. तर न्यूझीलंडविरुद्ध भारतात खेळताना भारतीय संघाने एकही कसोटी मलिका गमावलेली नाही. त्यामुळे भारतीय संघाचा हा रेकॉर्ड न्यूझीलंडचं टेन्शन वाढवणारा आहे. या कसोटी मालिकेत भारतीय संघाचं पारडं जड राहणार यात काहीच शंका नाही.

IND vs NZ: भारत की न्यूझीलंड कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड
IND vs BAN मालिकेसह या खेळाडूची कारकीर्दही संपली! आधीच केली होती निवृत्तीची घोषणा

भारतीय संघासाठी अतिशय महत्वाची मालिका

ही मालिका भारतीय संघासाठी अतिशय महत्वाची असणार आहे. सध्या भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. मात्र अजूनही हा संघ फायनलसाठी पात्र ठरलेला नाही. भारतीय संघाला इथून पुढे ८ कसोटी सामने खेळायचे आहेत. जर फायनलमध्ये प्रवेश करायचा असेल तर कुठल्याही परिस्थितीत ८ पैकी ५ सामने जिंकावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com