rohit sharma twitter
Sports

Champions Trophy Final: टी-२० नंतर वनडेतही टीम इंडियाच किंग! न्यूझीलंडला नमवत भारताने उंचावली चॅम्पियन्स ट्रॉफी

India vs New Zeland, ICC Champions Trophy Final: भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात भारतीय संघाने शानदार विजयाची नोंद केली आहे.

Ankush Dhavre

अखेर कोट्यावधी भारतीयांचं स्वप्नं पूर्ण झालं आहे. भारतीय संघाने न्यूझीलंडला पराभूत करत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेची ट्रॉफी उंचावली आहे. भारताला ही ट्रॉफी जिंकण्यासाठी १२ वर्ष वाट पाहावी लागली. यापूर्वी २०१७ मध्ये झालेल्या फायनलमध्ये भारतीय संघाला पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र आता भारताने न्यूझीलंडचा पराभव करत जेतेपदाची ट्रॉफी उंचावली आहे.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील फायनलचा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये पार पडला. या सामन्यातील पहिल्या डावात न्यूझीलंडचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात आला होता. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडला ५० षटकअखेर २५१ धावा करता आल्या होत्या. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी २५२ धावा करायच्या होत्या.

रोहितची दमदार सुरुवात

भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी २५२ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना रोहित शर्माने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत ८३ चेंडूंचा सामना करत ७६ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ७ चौकार आणि ३ षटकार मारले. रोहित आणि गिलने शतकी भागीदारी केली.

तर शुभमन गिलने ३१ धावांची खेळी केली. ही जोडी फुटल्यानंतर विराटही स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेलने मिळून भारतीय संघाचा डाव सांभाळला. अय्यरने ६२ चेंडूंचा सामना करत ४८ धावांची खेळी केली. अक्षर पटेलने ४० चेंडूंचा सामना करत २९ धावांची खेळी केली. शेवटी हार्दिक पंड्या आणि राहुलने मिळून भारतीय संघाला विजय मिळवून दिला.

चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतीय संघ अजेय

या स्पर्धेती भारतीय संघाचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. या स्पर्धेत भारतीय संघाने एकही सामना गमावला नाही. साखळी फेरीतील ३ सामने जिंकल्यानंतर भारताने सेमीफायनल आणि फायनलमध्ये शानदार विजयाची नोंद केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heavy Rain : अकोला जिल्ह्याला पावसाने झोडपले; गावांमध्ये शिरले पाणी, वाडेगाव ते बाळापुर वाहतूक बंद

आर्थिक अडचण आलीय? UPI दूर करणार तुमची समस्या, बँकेत न जाता मिळेल Loan

Thane : मोठी बातमी! मंगळवारी पावसाचा रेड अलर्ट, ठाण्यातील सर्व शाळांना सुट्टी

INDIA Alliance vs Election Commission:मतचोरीचा वाद टोकाला! इंडिया आघाडी मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात आणणार महाभियोग, काय असते प्रक्रिया?

Maharashtra Rain Live News: सायन पनवेल महामार्गावर मुसळधार पाऊस

SCROLL FOR NEXT