new zealand twitter
क्रीडा

IND vs NZ 2nd Test,Day 3: टीम इंडिया अजूनही जिंकू शकते सामना! फक्त करावं लागेल हे काम

India vs New Zealand 2nd Test: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाला अजूनही सामना जिंकण्याची संधी आहे.

Ankush Dhavre

India vs New Zealand 2nd Test Live Score: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना पुण्यात सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने गमावला आहे. तर दुसऱ्या सामन्यातही भारतीय संघ पराभवाच्या उंबरठ्यावर आहे.

आता कुठला चमत्कारच भारतीय संघाला परभवापासून वाचवू शकतो. पहिल्या डावात मोठी आघाडी घेतलेल्या न्यूझीलंडने दुसऱ्या डावातही मोठी आघाडी घेतली आहे.

त्यामुळे भारतीय संघाला चौथ्या डावात सामना जिंकण्यासाठी धावांचा डोंगर सर करावा लागेल. मात्र अजूनही भारतीय संघ हा सामना जिंकू शकतो. यासाठी काय करावं लागेल समजून घ्या.

फिरकी गोलंदाजांवर जबाबदारी

पुण्यातील खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरत आहे. हे वॉशिंग्टन सुंदर आणि मिचेल सॅंटनरने दाखवून दिलं. दोघांनी पहिल्या डावात गोलंदाजी करताना प्रत्येकी ७-७ गडी बाद केले. त्यामुळे या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना विकेट मिळणं कठीण आहे.

न्यूझीलंडने ३०० पेक्षा अधिक धावांची आघाडी घेतली आहे. जर आर अश्विन, रविंद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या जोडीने न्यूझीलंडच्या फलंदाजांना लवकर बाद केलं तर भारतीय संघाला कमी धावांचं आव्हान मिळू शकतं.

धावांचा पाठलाग करावाच लागेल

कसोटीत पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारणं तितकं कठीण काम नसतं. मात्र चौथ्या डावात फलंदाजी करताना धावांचा पाठलाग करणं हे खूप आव्हानात्मक आहे. ज्या पद्धतीने हा खेळ सुरू आहे, त्यावरून भारतीय संघाला ३५० किंवा ४०० धावांचे आव्हान मिळू शकते. हे आव्हान सर करणं म्हणजे कठीण नव्हे तर जवळजवळ अशक्य आहे. मात्र भारताला जर हा सामना जिंकायचा असेल तर आव्हान कुठल्याही परिस्थितीत गाठावच लागेल. जर हा सामना ड्रॉ करायचा असेल तर भारतीय संघाला २ दिवस फलंदाजी करावी लागेल जे या खेळपट्टीवर अशक्य आहे.

टीचुन फलंदाजी

या सामन्यात भारतीय संघ जेव्हा धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात येईल त्यावेळी भारतीय सलामीवीरांना चांगली सुरुवात करून द्यावी लागेल. जयस्वाल आणि रोहितने जर शतक झळकावलं, तर भारताने अर्धा सामना जिंकलाच समजा. त्यानंतर विराट कोहलीने आणि सरफराज खानने जबाबदारी घेऊन शेवटपर्यंत फलंदाजी केली, तर भारतीय संघ हा सामना जिंकू शकतो. भारताने यापूर्वीही ३०० पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे. त्यामुळे कठीण असं काहीच नाही. मात्र भारतीय फलंदाजांची कसोटी नक्कीच लागणार आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT