पुणे कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून दुसऱ्या दिवशी भारतीय संघांची खराब कामगिरी पाहायला मिळाली. संपूर्ण संघ अवघा १५७ धावांवर बाद झाला. त्यामुळे न्युझीलंडच्या संघाला १०३ धावांची आघाडी मिळाली. न्युझीलंडच्या संघाने पहिल्या डावात १०३ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी खेळतांना ५ विकेट गमावत किवीच्या संघात १९८ धावा केल्या, यामुळे आता संघाने ३०१ धावांची आघाडी घेतलीय.
भारत आणि न्युझीलंडमध्ये कसोटी सामने खेळला जात आहे. पुणे कसोटीच्या दुसऱ्या दिवशी न्युझीलंडने आपल्या पहिल्या डावात २५९ धावा केल्या. त्यानंतर मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने पहिल्या दिवशी १ विकेट गमावत १६ धावा केल्या होत्या. मात्र दुसऱ्या दिवशी भारतीय संघाच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. भारतीय फलंदाजांना फिरकी गोलंदाजीविरुद्धात खेळताना अडचणी आल्या. संपूर्ण संघ अवघ्या १५६ धावांमध्ये बाद झाला. यशस्वी जयस्वाल ३० धावा, शुभमन गिल ३० धावा, आणि रविंद्र जडेजाने ३८ धावा केल्या.
न्युझीलंडकडून गोलंदाजी करतांना गोलंदाज सेंटनरने ७ विकेट घेतल्या. सेंटनरने भारतीय संघाचा कणा तोडत संपूर्ण संघाला १५६ धावांमध्ये आपला डाव गुंडाळावा लागला. सेंटनरच्या घातक गोलंदाजीमुळे किवीच्या संघाला १०३ धावांची आघाडी मिळाली.
किवीच्या संघाने दुसऱ्या डावात चमकदार कामगिरी करताना ५ गडी गमावून १९८धावा केल्या. अशा प्रकारे संघाने एकूण ३०१ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने ८६ धावांची शानदार खेळी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.