team india  yandex
Sports

IND vs NZ: सतत संधी मिळूनही ठरतोय फ्लॉप! रोहित या स्टार खेळाडूला बसवणार

Mohammed Siraj: भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना पुण्यात रंगणार आहे.

Ankush Dhavre

IND vs NZ, Playing XI: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना पुण्यात रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना बंगळुरूत पार पडला. या सामन्यात भारतात संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

या मालिकेत न्यूझीलंडचा संघ १-० ने आघाडीवर आहे. त्यामुळे भारताला दुसरा सामना कुठल्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे. या सामन्यासाठी कर्णधार रोहित शर्मा भारताच्या प्लेइंग ११ मध्ये बदल करू शकतो.

हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर रंगणार आहे. या मैदानावरील रेकॉर्ड पाहिला, तर भारतीय संघाने या मैदानावर २ कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान एका सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर एका सामन्यात विजय मिळवला आहे. या मैदानावर भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलंय. तर ऑस्ट्रेलियाकडून पराभूत व्हावं लागलं आहे.

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने रोहित शर्माचं टेन्शन वाढवलं आहे. कारण त्याला सातत्याने संधी दिली जात आहे. मात्र तो या संधीचा फायदा घेऊ शकलेला नाही. गेल्या ७ सामन्यांमध्ये त्याला केवळ १२ गडी बाद करता आले आहेत. सिराजच्या या सुमार कामगिरीमुळे जसप्रीत बुमराहवरील दबाव वाढत चालला आहे. बुमराह एका बाजूने विकेट्स घेतोय, तर सिराज दुसरीकडे विकेट्स घेण्यात अपयशी ठरतोय.

सिराजच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने २०२० मध्ये भारतीय संघासाठी पदार्पण केलं होतं. तेव्हापासून त्याने ३० सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ८० गडी बाद केले आहेत. तर न्यूझीलंडविरुद्धच्या २ सामन्यांमध्ये त्याने ५ गडी बाद केले आहेत.

या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उप-कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, वॉशिंग्टन सुंदर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bareli Protest : बरेलीत नमाजावेळी मोठा गोंधळ, शेकडो आंदोलक रत्यावर उतरले; पोलिसांचा लाठीचार्ज

Vastu Tips Of Lighting Diya: घरात या दिशेला ठेवू नये पेटता दिवा, ओढवेल मोठं संकट

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

SCROLL FOR NEXT