IND vs NZ: न्यूझीलंडला मोठा धक्का! मॅचविनर खेळाडू दुसऱ्या सामन्यातूनही बाहेर

Kane Williamson Ruled Out: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या सामन्यापूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे.
IND vs NZ: न्यूझीलंडला मोठा धक्का! मॅचविनर खेळाडू दुसऱ्या सामन्यातूनही बाहेर
new zealandyandex
Published On

IND vs NZ, 2nd Test: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ३ कसोटी सामन्यांचा थरार सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या मालिकेत न्यूझीलंडचा संघ १-० ने आघाडीवर आहे. त्यामुळे पुण्यात होणारा दुसरा सामना जिंकून न्यूझीलंडचा संघ मालिका खिशात घालण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे.

न्यूझीलंडचा स्टार खेळाडू केन विलियम्सन हा फिट नसल्यामुळे पहिला सामना खेळू शकला नव्हता. २४ ते २८ ऑक्टोबर दरम्यान दुसऱ्या कसोटी सामन्याचा थरार रंगणार आहे. मात्र या सामन्यापूर्वीही केन विलियम्सन पूर्णपणे फिट होऊ शकलेला नाही. त्यामुळे तो दुसऱ्या कसोटी सामन्यालाही मुकणार आहे. केन विलियम्सन हा न्यूझीलंड संघातील सर्वात अनुभवी खेळाडू आहे. त्यामुळे तो संघाबाहेर असणं हा न्यूझीलंड संघासाठी मोठा धक्का आहे.

IND vs NZ: न्यूझीलंडला मोठा धक्का! मॅचविनर खेळाडू दुसऱ्या सामन्यातूनही बाहेर
IND vs NZ: टीम इंडियासाठी गुड न्यूज! दुसऱ्या कसोटीपूर्वी स्टार खेळाडू फिट

न्यूझीलंड क्रिकेटने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत अपडेट दिली आहे. केन विलियम्सन दुखापतग्रस्त असल्यामुळे या सामन्यासाठी उपलब्ध नसणार असल्याचं या पोस्टमध्ये लिहिलं आहे. न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड म्हणाले की, ' तो दुखापतीतून सावरत आहे. मात्र तो अजूनही कसोटी क्रिकेटमध्ये कमबॅक करण्यासाठी पूर्णपणे फिट नाही. तो तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळताना दिसून येऊ शकतो.

IND vs NZ: न्यूझीलंडला मोठा धक्का! मॅचविनर खेळाडू दुसऱ्या सामन्यातूनही बाहेर
IND vs NZ: पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल! स्टार खेळाडू संघात परतला

या मालिकेतील पहिला कसोटी सामना बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये पार पडला. या सामन्यातील पहिला दिवस पावसामुळे धुतला गेला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भारताने नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

प्रथम फलंदाजी करताना, भारताचा डाव अवघ्या ४६ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडने ४०२ धावांचा डोंगर उभारला. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाने ४६२ धावा केल्या. यासह न्यूझीलंडला जिंकण्यासाठी १०७ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडने ८ गडी राखून विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com