glenn philips twitter
Sports

Virat Kohli Catch: चित्त्यासारखी झेप घेतली अन् ०.६२ सेंकदात फिलिप्सने घेतला भन्नाट कॅच; विराटला शॉकच बसला- VIDEO

Glenn Philips Catch: न्यूझीलंडचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ग्लेन फिलिप्सने डाईव्ह मारत अवघ्या ०.६२ सेकंदात शानदार झेल घेतला.

Ankush Dhavre

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटचा सामना भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. हा सामना भारतीय संघातील अनुभवी फलंदाज विराट कोहलीसाठी अतिशय स्पेशल होता.

विराट आपल्या वनडे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ३०० वा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. मात्र या सामन्यात विराटला मोठी खेळी करता आली नाही. तो अवघ्या ११ धावा करत तंबूत परतला. विराटने क्लासिक शॉट मारला होता. मात्र जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्लेन फिलिप्सने अविश्वसनिय झेल घेतला आणि विराटला तंबूत धाडलं.

न्यूझीलंडने नाणेफक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिल ही जोडी डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात आली होती. मात्र या जोडीला हवी तशी सुरुवात करता आली नव्हती. विराट ११ धावांवर फलंदाजी करत असताना भारतीय संघाला तिसरा धक्का बसला.

तर झाले असे की, भारतीय संघाची फलंदाजी सुरु असताना, न्यूझीलंडकडून ७ वे षटक टाकण्यासाठी मॅट हेनरी गोलंदाजीला आला होता. या षटकातील चौथ्या चेंडूवर विराट कोहलीने ऑफ साईडच्या दिशेने शॉट मारण्याचा प्रयत्न केला.

मात्र चेंडूत हवेत गेला त्यावेळी ग्लेन फिलिप्स पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षण करत होता. हा चेंडू वेगाने आला आणि ग्लेन फिलिप्सला अवघ्या ०.६२ सेकंदांचा वेळ मिळाला. फिलिप्सने इतका कमी वेळ असतानाही डाईव्ह मारत शानदार झेल घेतला. हा झेल पाहून विराटलाही मोठा धक्का बसला. इतकंच काय तर स्टँड्समध्ये सामना पाहण्यासाठी आलेल्या अनुष्का शर्मानेही डोक्याला हात लावला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

या सामन्यासाठी अशी आहे भारतीय संघाची प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, अक्षर पटेल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, वरूण चक्रवर्ती, कुलदीप यादव.

न्यूझीलंडची प्लेईंग ११

विल यंग, ​​रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), मॅट हेन्री, काइल जेमिसन, विल्यम ओरोरके.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गावागावात लॉरेन्स बिष्णोई तयार व्हायला पाहिजे'; किर्तनकार भंडारे काय बोलून गेले? VIDEO

Asia Cup 2025 Final : भारताविरुद्ध फायनलआधी पाकिस्तानच्या महत्वाच्या खेळाडूंना ICC चा दणका

Maharashtra Live News Update: परभणी जिल्ह्यात 3 दिवसानंतर पुन्हा एकदा जोरदार पाऊस

Hypertension India: २१ कोटी भारतीयांना हाय ब्लड प्रेशरचा धोका! तिशी ओलांडलेल्या तरुणांनो व्हा सावध, WHO नेमकं काय सांगितलं?

आदिवासी समाजाचा मुंबई बंदचा इशारा; 'आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा', हजारो बांधव सहभागी|VIDEO

SCROLL FOR NEXT