Virat Kohli Century: नाद करा पण आमचा कुठं! आधी TV फुटले, मग विराटच्या शतकाचा पाकिस्तानात जल्लोष - VIDEO

Virat Kohli Century Celebration In Pakistan: भारतीय संघाने पाकिस्तानचा ६ गडी राखून धुव्वा उडवला. दरम्यान विराटने शतक साजरं केल्यानंतर पाकिस्तानातही जल्लोष पाहाया मिळाला.
Virat Kohli Century: नाद करा पण आमचा कुठं! आधी TV फुटले, मग विराटच्या शतकाचा पाकिस्तानात जल्लोष - VIDEO
virat kohlitwitter
Published On

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना क्रिकेटमधील महायुद्धापेक्षा कमी नसतो. जेव्हा जेव्हा हे दोन्ही संघ आमनेसामने येतात, तेव्हा क्रिकेट चाहत्यांना अॅक्शनपॅक सामना पाहायला मिळत असतो. सामना भारतात असो की भारताबाहेर, क्रिकेट चाहते स्टेडियममध्ये तुफान गर्दी करताना दिसून येत असतात.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाने पुन्हा एकदा दमदार कामगिरी केली आणि पुन्हा एकदा पाकिसानातील क्रिकेट फॅन्सला टीव्ही फोडायला भाग पाडलं. ज्याचे असंख्य व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

Virat Kohli Century: नाद करा पण आमचा कुठं! आधी TV फुटले, मग विराटच्या शतकाचा पाकिस्तानात जल्लोष - VIDEO
Ind vs Pak : बाय बाय पाकिस्तान! सलग दुसऱ्या पराभवानंतर नेटकऱ्यांनी पाकिस्तानची उडवली खिल्ली, मीम्स पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल

पाकिस्तानचा पराभव आणि क्रिकेट फॅन्सचं टीव्ही फोडणं हे काही वेगळं समीकरण नाही. जेव्हा जेव्हा पाकिस्तानचा पराभव झालाय, तेव्हा तेव्हा फॅन्स टीव्ही फोडताना दिसून आला. मात्र यावेळी वेगळंच चित्र पाहायला मिळालं आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात पाकिस्तानी क्रिकेट फॅन्स विराटच्या शतकानंतर जल्लोष करताना दिसून आले आहेत.

Virat Kohli Century: नाद करा पण आमचा कुठं! आधी TV फुटले, मग विराटच्या शतकाचा पाकिस्तानात जल्लोष - VIDEO
Ind vs Pak : बाय बाय पाकिस्तान! सलग दुसऱ्या पराभवानंतर नेटकऱ्यांनी पाकिस्तानची उडवली खिल्ली, मीम्स पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल

विराटच्या शतकाचा पाकिस्तानात जल्लोष

गेल्या काही महिन्यांपासून विराटची बॅट शांत होती. विराट फॉर्ममध्ये केव्हा परतणार, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र जेव्हा भारतीय संघाला सर्वात जास्त गरज होती, तेव्हा विराटची बॅच गरजली. विराटने पाकिस्तानी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला आणि भारतीय संघाचा विजय निश्चित केला, शेवटी सर्वांना वेध लागले होते, ते म्हणजे विराट कोहलीच्या शतकाचे. विजयासाठी धावा कमी आणि शतकासाठी लागणाऱ्या धावा जास्त होत्या. मात्र विराटने शानदार खेळी सजवली आणि शेवटच्या चेंडूवर चौकार मारुन आपलं शतक पूर्ण केलं.

पाकिस्तानचा पराभव आणि विराटचं शानदार शतक याचा भारतात जोरदार जल्लोष झाला, तर दुसरीकडे पाकिस्तानातही विराटच्या शतकाचा जल्लोष पाहायला मिळाला. पाकिस्तानी क्रिकेट फॅन्स डान्स करुन विजयाचा जल्लोष साजरा करताना दिसून आले. यासह विराट- विराटचे नारे देखील देताना दिसून आले. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com