IND vs NZ Champions Trophy 2025 Final Weather Updates Saam Tv
Sports

IND vs NZ, Weather Updates : भारत-न्यूझीलंड सामन्यावर पावसाचे सावट? हवामानाचा अंदाज काय? वरूणराजा बरसला तर कोण चॅम्पियन होणार?

Champions Trophy 2025 Final : दुबईमध्ये उद्या भारत विरुद्ध न्यूझीलंड हा अंतिम सामना खेळला जाणार आहे. या सामन्यादरम्यान हवामान कसे असेल? पाऊस पडला तर कोण सामना जिंकेल? जाणून घ्या सविस्तर माहिती..

Yash Shirke

Ind vs Nz Final : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा अंतिम सामना अवघ्या काही तासांमध्ये दुबईत खेळला जाणार आहे. या सामन्यामध्ये भारत आणि न्यूझीलंड हे दोन संघ एकमेकांसमोर येणार आहेत. अंतिम सामन्यादरम्यान स्वच्छ हवामान असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पाऊस पडण्याची शक्यता नसल्याचेही म्हटले जात आहे. पण जर पाऊस पडला, तर अंतिम सामना रिझर्व्ह डेच्या दिवशी खेळवला जाईल.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उद्या ९ मार्च रोजी दुबईमध्ये तापमान ३३ डिग्री सेल्सियस राहणार आहे. सामना सुरु असताना पाऊस पडण्याची शक्यता नाहीये. भारत विरुद्ध न्यूझीलंड अंतिम सामना २.३० वाजता सुरु होणार आहे. तेव्हा हवामान स्वच्छ राहणार आहे. हवेचा वेग सामान्य असेल. यामुळे गोलंदाजी करायला अडचण येणार नाही.

आयसीसीच्या मुख्य स्पर्धांमध्ये अंतिम सामन्यांसाठी रिझर्व्ह डेची सोय केलेली असते. जर ठरलेल्या दिवशी काही कारणांमुळे सामना खेळला गेला नाही, तर दुसऱ्या दिवशी रिझर्व्ह डेला अंतिम सामना खेळवला जातो. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ अंतिम सामन्याचा रिझर्व्ह डे १० मार्च रोजी आहे. जर रिझर्व्ह डेच्या दिवशीही खेळ झाला नाही, तर मग सुपर ओव्हरद्वारे विजेता ठरवला जातो.

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये भारताची विजयी घोडदौड सुरु आहे. टीम इंडियाने बांगलादेश, पाकिस्तान, न्यूझीलंड या संघावर ग्रुप स्टेजमध्ये विजय मिळवला. उपांत्य फेरीमध्ये बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा भारताने पराभव केला. आता अंतिम सामन्यामध्ये भारतासमोर पुन्हा एकदा न्यूझीलंडचे आव्हान आहे.

दरम्यान या चारही सामन्यांमध्ये टीम इंडियाच्या प्लेईंग ११ मध्ये फारसा बदला झाला नसल्याचे पाहायला मिळते. अंतिम सामन्यामध्येही बदल होणार नसल्याचे अंदाज वर्तवला जात आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातील भारताची संभाव्य प्लेईंग ११ -

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime : मैत्रिणीला भेटून घरी जात होती, नराधमांनी कारमध्ये ओढलं; १६ वर्षीय मुलीवर धावत्या कारमध्ये लैंगिक अत्याचार

Mahashtra Politics : महायुतीत नाराजीनाट्य; माधुरी मिसाळांच्या बैठकीवर शिरसाटांची नाराजी, नेमकं काय घडलं? VIDEO

Ladki Bahin Yojana : लाडकीच्या पैशांवर भावांचा डल्ला, 14 हजार भावांनी लाटले तब्बल 21 कोटी

Maharashtra Politics : धनंजय मुंडे पुन्हा मंत्रीपदी? अजित पवारांनी दिले संकेत, नेमकं काय म्हणाले? VIDEO

Maharashtra Live News Update: दहशतवाद्यांना मातीत गाडण्यासाठी 'मेक इन इंडिया'ची मोठी भूमिका - PM मोदी

SCROLL FOR NEXT