Champions Trophy Final: दुबईच्या मैदानाचा भारतालाच फायदा, फायनलआधी किवी कर्णधाराने फोडलं वादाला तोंड

Dubai Pitch, IND vs NZ CT 2025: भारत आणि न्यूझीलंडच्या संघात चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना ९ मार्च रोजी होणार आहे. या सामन्याबाबत किवी कर्णधार मिचेल सँटनरनं एक विधान केलंय. यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
Champions Trophy Final 2025 IND vs NZ
Dubai Pitch, IND vs NZ CT 2025saamtv
Published On

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा हायब्रिड मॉडेलमध्ये खेळली गेली. सुरक्षेच्या कारणास्तव आणि सरकारची मान्यता नसल्यामुळे भारतीय संघ पाकिस्तानला गेला नाही. यामुळे भारताने सर्व सामन्यांसाठी न्यूटल वेन्यू असलेल्या दुबईची निवड केली आणि तेथे सामने खेळले. आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना ९ मार्च रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे.

Champions Trophy Final 2025 IND vs NZ
Champions Trophy 2025: फायनलआधी टीम इंडियासाठी खूशखबर, भारताला नडणारा न्यूझीलंडचा स्टार खेळाडू बाहेर?

भारत दुबईत खेळण्याबाबत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियातील अनेक क्रिकेटपटूंकडून विधाने आली. भारत दुबईमध्ये खेळत असल्याने टीम इंडियाला याचा फायदा झाला असं अनेकांनी दावा केलाय. यावर नुकतेच भारतीय कर्णधार रोहित शर्माने सांगितले की, ते दुबईत खेळत आहे, हे त्यांचे होमग्राऊंड नाहीये. पण आता रिघ ओढत न्यूझीलंडचा कर्णधार म‍िचेल सेंटनरनेही इतर खेळाडूंप्रमाणे विधान केलंय.

न्यूझीलंडच्या कर्णधारानेही दुबईच्या खेळपट्टीवर वक्तव्य केले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलपूर्वी हे विधान केल्याने वादाला तोंड फुटलंय. न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर म्हणाला की, भारत दुबईच्या संथ खेळपट्टीशी परिचित आहे. मात्र आपला संघही चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत ‘लढण्यासाठी’ सज्ज असल्याचेही त्याने सांगितले. भारतविरुद्ध ९ मार्च रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यापूर्वी किवी संघ गुरुवारी संध्याकाळी दुबईला पोहोचलाय.

Champions Trophy Final 2025 IND vs NZ
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलसाठी अनोखा नियम, 'ती' एक ओव्हर ठरु शकते सामन्याचा टर्निंग पॉइंट

भारताने दुबईत सर्व सामने खेळले आहेत. ते खेळपट्टी जाणून आहेत. दरम्यान आम्हाला कसं खेळायचं आहे, ते आम्ही ठरवू. येथील खेळपट्टी कदाचित लाहौरपेक्षा संथ खेळपट्टी असेल, पण आम्ही जोरदार झुंज देण्यास तयार आहोत, असं सँटनर म्हणाला. सँटनर म्हणाला की, न्यूझीलंडला ग्रुप फेरीदरम्यान भारताविरुद्ध खेळण्याच्या अनुभवातून थोडा दिलासा मिळू शकतो.

अ गटातील सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 44 धावांनी पराभव केला. आम्ही एका चांगल्या संघाविरुद्ध खेळत आहोत. मला वाटते की आम्ही गेल्या दिवशी त्यांच्याविरुद्ध केलेल्या कामगिरीपेक्षा चांगली कामगिरी करू (कसोटी मालिकेत भारताला 3-0 ने पराभूत केले). आम्ही काही प्रमाणात चांगली कामगिरी केलीय. आशा आहे आताही तशीच कामगिरी करू असं सॅटनर म्हणाला.

न्यूझीलंडला सेमीफायनल आणि फायनलसाठी अल्पावधीतच पाकिस्तान आणि दुबईदरम्यान प्रवास करावा लागला. यावर कर्णधार म्हणाला की, संघाने गेल्या काही दिवसांतील व्यस्त वेळापत्रकात जुळवून घेतले आहे. दरम्यान या टूर्नामेंटचा हा अनुभव आहे, यात खूप पळापळ करावी लागली. हे सर्व एक आव्हान आहे. मला वाटतं की खेळाडूंना हे समजले आहे की हा सर्व खेळाचा भाग आहे. जोपर्यंत तुम्ही खेळण्यास तयार आहात तोपर्यंत सर्व काही चांगले आहे, असंही सॅटनर म्हणाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com