ind vs nz twitter
क्रीडा

India vs New Zealand: वॉशिंग्टन अन् जडेजाची 'सुंदर' गोलंदाजी! न्यूझीलंडचा पॅकअप

IND vs NZ 3rd Test Day 1: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरु आहे.

Ankush Dhavre

India vs New Zealand 3rd Test: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याचा थरार मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात भारतीय फिरकी गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांनाच नाचवून ठेवलं. भारताकडून गोलंदाजी करतना आकाश दीपने १ गडी बाद केले. तर रविंद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी मिळून ९ गडी बाद केले. यासह न्यूझीलंडचा संपूर्ण डाव अवघ्या २३५ धावांवर आटोपला आहे.

न्यूझीलंडचा डाव २३५ धावांवर आटोपला

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र भारतीय गोलंदाजांनी हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. कारण भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासून न्यूझीलंडला मोठे धक्के दिले. सुरुवात आकाश दीपपासून झाली. त्याने डेवोन कॉनव्हेला बाद करत न्यूझीलंडला पहिला मोठा धक्का दिला. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने टॉम लेथमला बाद करत माघारी धाडलं.

त्यानंतर रविंद्र जडेजा शो पाहायला मिळाला. जडेजाने २ षटकात ४ गडी बाद केले. त्याने सुरुवातीला विल यंगला बाद केलं. त्यानंतर टॉम ब्लंडेललाही बाद करत माघारी धाडलं. त्यानंतर त्याने ईश सोडी आणि मॅट हेनरीला बाद करत माघारी धाडलं. न्यूझीलंडकडून फलंदाजी करताना विल यंगने ७१ आणि डॅरील मिशेलने ८२ धावांची खेळी केली. तर भारताकडून गोलंदाजी करताना, आकाश दीपने १, वॉशिंग्टन सुंदरने ४ आणि रविंद्र जडेजाने ५ गडी बाद केले.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

न्यूझीलंड - टॉम लेथम (कर्णधार), डेवोन कॉनव्हे, विल यंग, रचिन रविंद्र, डेरिल मिचेल, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, इश सोढी, मॅट हेनरी, एजाज पटेल, विल्यम ओ’रुर्क.

भारत: यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन, आकाश दीप, मोहम्मद सिराज.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : हिंगोली शहरात कल्याण मंडपच्या बाजूला आग

MP Mobile Phone Blast : स्वयंपाक करताना कढईत पडला मोबाइल, बॅटरीच्या स्फोटात तरुणाचा गेला जीव

Winter Travel : नंदुरबार जिल्ह्यात लपलंय थंड हवेचे ठिकाण, इथे घ्या सुट्टीचा मनमुराद आनंद !

Muhurat Trading 2024: शेअर बाजारावर लक्ष्मी प्रसन्न, मुहूर्त ट्रेडिंगवर सेन्सेक्सने 500 हून अधिक अंकांची घेतली उसळी

FIR Against Arvind Sawant: 'माल' विधान भोवलं, शायना एनसी यांच्या तक्रारीवरून अरविंद सावंत यांच्याविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT