r ashwin twitter
Sports

R Ashwin Catch: अश्विन अण्णाचा नाद करायचा नाय.. मागे धावत घेतला कपिल देव स्टाईल कॅच - VIDEO

IND vs NZ 3rd Test: आर अश्विनने लाँग ऑनला क्षेत्ररक्षण करताना शानदार झेल घेतला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

IND vs NZ 3rd Test, R Ashwin Catch: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या सामन्यातील दुसऱ्या डावात आर अश्विनने सर्वांनाच आश्चर्यचकीत करणारा झेल टीपला आहे. न्यझीलंडकडून दुसऱ्या डावात फलंदाजी करताना डॅरील मिशेल आणि विल यंगची जोडी चांगलीच जमली होती. मात्र आर अश्विनच्या शानदार कॅचमुळे ही जोडी फुटली. दरम्यान अश्विनने घेतलेल्या कॅचचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

तर झाले असे की, भारतीय संघाकडून २८ वे षटक टाकण्यासाठी रविंद्र जडेजा गोलंदाजीला आला होता. या षटकातील पाचव्या चेंडूवर मिशेलने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आर अश्विन लाँग ऑनला क्षेत्ररक्षण करत होता. चेंडू उंच हवेत गेला, मात्र अश्विनपासून दूर होता. तरीही अश्विनने मागच्या दिशेने धाव घेतली आणि डाईव्ह मारत कपिल देव स्टाईल झेल घेतला.

न्यूझीलंडचा अर्धा संघ तंबूत

भारतीय संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना २८ धावांची आघाडी घेतली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडला पहिल्याच षटकात मोठा धक्का बसला. टॉम लेथम अवघ्या १ धावेवर क्लिन बोल्ड होऊन माघारी परतला.

त्यानंतर डेव्होन कॉनव्हे २२ धावांवर माघारी परतला. रचिन रविंद्रही अवघ्या ४ धावा करत तंबूत परतला. त्यानंतर विल यंग आणिा डॅरील मिशेलने संघाचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. दोघांनी महत्वपूर्ण भागीदारी केली. मात्र जडेजाने ही भागीदारी तोडली.

भारतीय संघाने केल्या २६३ धावा

न्यूझीलंडचा पहिला डाव २३५ धावांवर आटोपल्यानंतर भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल ही जोडी मैदानावर आली. मात्र भारतीय संघाला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला. रोहित शर्मा १८ धावा करत माघारी परतला.

त्यानंतर यशस्वी जयस्वाल ३०, मोहम्मद सिराज ०, विराट कोहली ४ धावा करत माघारी परतला. भारताकडून फलंदाजी करताना शुभमन गिलने सर्वाधिक ९० धावांची खेळी केली. तर रिषभ पंतने ६० आणि वॉशिंग्टन सुंदरने नाबाद ३८ धावांची खेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price Today: सोन्याने गाठला नवा उच्चांक! १ तोळा सोनं १ लाख ३२ हजारांवर; सुवर्णनगरीतील आजचे दर किती?

Famous Actor Missing : 'मुन्ना भाई एमबीबीएस'मधील लोकप्रिय अभिनेता बेपत्ता; गर्लफ्रेंडसोबत होती भांडणं, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Accident News : समृद्धी महामार्गावर एका रात्रीत चार अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! ५ वर्षात मिळणार ५ लाखांचं व्याज; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT