भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघ बॅकफूटवर असताना गिलने सावध पवित्रा घेत, शानदार ९० धावांची खेळी केली. त्याचं शतक अवघ्या १० धावांनी हुकलं. मात्र त्याने भारतीय संघाला मजबूत स्थितीत पोहोचवलं आहे.
या सामन्यातील पहिल्या डावातील पहिल्याच दिवशी भारतीय संघाचा डाव गडगडला होता. संघातील ४ फलंदाज स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर फलंदाजी करत असलेल्या रिषभ पंत आणि शुभमन गिलवर संघाचा डाव पुढे नेण्याची मोठी जबाबदारी होती.
दोघांनी पहिल्या सेशनमध्ये धावांचा पाऊस पाडत ९६ धावांची शानदार भागीदारी केली. त्यानंतर रिषभ पंत बाद होऊन माघारी परतला. एका बाजूने विकेट जात होते, तर गिलने एक बाजू धरुन ठेवली होती.
शुभमन गिलला या सामन्यात शतक झळकावण्याची सुवर्णसंधी होती. मात्र त्याचं हे शतक १० धावांनी हुकलं. ज्या खेळपट्टीवर इतर फलंदाज अडचणीत येत होते, त्याच खेळपट्टीवर गिल सहज फलंदाजी करत होता. त्यामुळे वाटलं होतं की, गिल या डावात मोठी खेळी करणार. मात्र असं होऊ शकलं नाही. १४६ चेंडूंचा सामना करत ९० धावांची खेळी करत माघारी परतला.
या सामन्यात शतक झळकावून गिलकडे मोठा रेकॉर्ड करण्याची संधी होती. यापूर्वी कुठल्याच भारतीय फलंदाजाने न्यूझीलंडविरुद्ध खेळताना तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावलं नव्हतं. हा रेकॉर्ड गिल करु शकला असता. यापूर्वी त्याने वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध शतक झळकावलं आहे. तर कसोटीतील शतक अवघ्या १० धावांनी हुकलं आहे. त्यामुळे गिलच्या हातून आजवर कोणालाही न जमलेला रेकॉर्ड करण्याची संधी निसटली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.