new zealand twitter
Sports

IND vs NZ 2nd Test: एकटा सँटनर टीम इंडियाला नडला! तब्बल 12 वर्षांनंतर भारताने गमावली कसोटी मालिका

India vs New Zealand 2nd Test: पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर पार पडलेल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Ankush Dhavre

India vs New Zealand 2nd Test Match Highlights: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय फलंदाजांचा फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे.

न्यूझीलंडने भारताचं अस्त्र भारताविरुद्धच वापरुन मालिका विजय मिळवला आहे. बंगळुरुतील एम चिन्नास्वामीच्या मैदानावर झालेल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. आता दुसऱ्या सामन्यातही न्यूझीलंडने भारतीय संघाला पराभूत करत इतिहास रचला आहे.

न्यूझीलंडने रचला इतिहास

भारतीय संघाने गेल्या १२ वर्षांपासून मायदेशात आपला दबदबा कायम ठेवला होता. मात्र न्यूझीलंडने ही मालिका खंडीत केली आहे. गेल्या १२ वर्षांत भारतीय संघाने मायदेशात एकही कसोटी गमावली नव्हती. २०२४ मध्ये म्हणजे तब्बल १२ वर्षांनंतर मालिका जिंकून इतिहास रचला आहे. यासह न्यूझीलंडने या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे.

भारताचा पराभव

भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी ३५९ धावा करायच्या होत्या. हे आव्हान तसं खूप मोठं होतं. कारण यापूर्वी केवळ एकदाच भारतीय संघाने ३५० पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. त्यामुळे भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी इतिहास बदलायचा होता.

मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना, रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालने आक्रमक सुरुवात करुन दिली. मात्र रोहितच्या रुपात भारतीय संघाला पहिला धक्का बसला. रोहित ८ धावा करत माघारी परतला.

त्यानंतर जयस्वाल आणि गिलने संघाचा डाव सांभाळला. दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. मात्र शुभमन गिल २३ धावांवर माघारी परतला. विराट १७ धावांची खेळी करत माघारी परतला. रिषभ पंतवर मोठी जबाबदारी होती. मात्र तो शून्यावर धावबाद होऊन माघारी परतला. त्यानंतर सरफराज खान ९ आणि आर अश्विन १८ धावांवर तंबूत परतला.

न्यूझीलंडकडून सँटनर नडला

फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल असणाऱ्या खेळपट्टीवर मिचेल सँटनरच्या गोलंदाजीची जादू पाहायला मिळाली. त्याने पहिल्या डावात गोलंदाजी करताना ७ गडी बाद केले होते. तर दुसऱ्या डावातही त्याने .. गडी बाद करत न्यूझीलंडसाठी विजय खेचून आणला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio VS Airtel: ₹२९९ प्रीपेड प्लॅनमध्ये जास्त डेटा कोण देईल, जिओ की एअरटेल?

8 November 2025 Horoscope: आज द्विग्रह योग होणार, मेष आणि मिथुन राशींसाठी असेल शुभ काळ

Pune News : पुण्यात शासनाची फसवणूक, ४६ बोगस दिव्यांग शिक्षकांची नावं समोर; कारवाईची टांगती तलवार

Maharashtra Weather : राज्यात थंडीची लाट, जळगावात तापमान १२.६ अंशांवर; इतर ठिकाणी काय स्थिती? | पाहा VIDEO

Mumbai Local: नवी मुंबईत धावत्या ट्रेनमधून पडून तरुणाचा मृत्यू, तोल गेला अन् रूळावर पडला

SCROLL FOR NEXT