Ravichandran Ashwin BCCI
Sports

IND vs ENG: अश्विनने कसोटीत रचला इतिहास, इंग्लंडविरुद्ध अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू

Ravichandran Ashwin : आज इंग्लंड आणि भारताच्या संघात चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. आजच्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज आकाश दीप याने आपला जलवा दाखवलाय. दीपने डकेट, ओली पोप आणि जॅक क्राउलीला बाद करत इंग्लंडच्या संघाला जोरदार झटके दिले.

Bharat Jadhav

Ravichandran Ashwin 100 Wickets In Test Matches Against England:

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्ट कसोटी सामन्यात भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन एक मोठा पराक्रम केलाय. अश्विनने रांचीमध्ये इंग्लंडच्या पहिल्या डावात जॉनी बेयरस्टोला पायचीत करत बाद केलं. त्याला बाद केल्यानंतर अश्विनने एक अनोखा विक्रम केलाय. रविचंद्रन अश्विनने इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळताना १०० विकेट घेतल्या आहेत. असा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज बनलाय. जगातील दुसरा गोलंदाज बनलाय. इंग्लंडच्या संघातील अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने हा विक्रम याआधी केलाय. त्यानेही १०० विकेट घेतल्या आहेत.(Latest News)

खास यादीत नाव दाखल

आर अश्विन कोणत्याही संघाविरुद्धात कसोटी सामन्यात १००० धावा करण्यासह १०० विकेट घेणारा तो सातवा खेळाडू बनलाय. त्याआधी ऑस्ट्रेलियाचा जॉर्ज गिफेनने इंग्लंडविरुद्ध हा कारनामा केलाय, ऑस्ट्रेलियाच्या मोनी नोबलने इंग्लंडविरुद्ध, इंग्लंडच्या विलफ्रेड रोड्सने ऑस्ट्रेलियाविरुद्ध, वेस्ट इंडिजच्या गारफील्ड सोबर्सने इंग्लंडविरुद्ध, इंग्लंडच्या इयान बॉथमने ऑस्ट्रेलियाविरुद्ध, इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १०० विकेट घेतल्या. अश्विनने इंग्लंडविरुद्ध केवळ २३ सामन्यांमध्ये १००० धावा आणि १०० बळी घेण्याच टप्पा पूर्ण केलाय. हा कारनामा या बाबतीत फक्त इयान बोथम त्याच्या पुढे आहे. बोथमने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अवघ्या २२ सामन्यांमध्ये ही कामगिरी केली होती.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जय शहाने केलं अभिनंदन

आर अश्विनने हा पराक्रम केल्यानंतर जय शहा यांनी त्याचे अभिनंदन करत त्याचं कौतुक केलंय. इंग्लंडविरुद्ध 100 कसोटी बळी घेणारा पहिला भारतीय बनून अश्विनने इतिहास रचलाय. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे क्रिकेटच्या इतिहासातील महान फिरकी गोलंदाजांपैकी एक म्हणून त्याचा दर्जा वाढलाय. त्याचा असाधारण पराक्रम त्याची प्रतिभा आणि खेळातील समर्पण अधोरेखित करत असल्याने त्याचे अभिनंदन असं जय शहा म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : काकीनं नवऱ्यासमोर पुतण्यासोबत केलं लग्न, दोघांचे ३ नवीन व्हिडिओ व्हायरल; लव्ह बर्ड्सचे चक्रावणारे रील

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

उद्धव ठाकरेंचा जय गुजरात घोषणेचा व्हिडिओ गुजरातमधला, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर | VIDEO

Mumbai Local Train : मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबईत रविवारी मेगाब्लॉक, कधी अन् कुठे ? जाणून घ्या सविस्तर

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT