IND vs ENG 4th Test Day 1 : पहिल्याच दिवशी आकाश दीपनं इंग्लंडला 'अस्मान' दाखवलं, पण जो रूट खेळला त्याला तोड नाही!

IND vs ENG 4th Test : रांचीच्या जेएससीए स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. चौथ्या कसोटीचा पहिला दिवस इंग्लंडचा ठरला. सुरुवातीचे विकेट गमावल्यानंतर इंग्लंडच्या संघाने पहिल्या दिवसाअंती ७ विकेट गमावत ३०२ धावा केल्या.
IND vs ENG 4th Test Day 1
IND vs ENG 4th Test Day 1SAAM TV

India vs England 4th Test Day 1 Highlights:

आज रांची येथील जेएससीए स्‍टेडियमवर भारत आमि इंग्लंडच्या संघात चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंड संघाने ७ विकेट गमावत ३०२ धावा केल्या आहेत. सुरुवातीच्या विकेट गमावल्यानंतर इंग्लंड संघाने सामन्यात पुनरागमन करत ३०० धावांचा टप्पा गाठला.

इंग्लंड संघाचा खेळाडू जो रुट दमदार खेळी करत एकट्याने १०६ धावा केल्या. तर ओली रोबिन्सनने ३१ धावा केल्या असून दोन्हीही खेळाडू क्रिजवर पाय रोवून उभे आहेत. जॅक क्राउलीने ४२ धावा करत संघाला ३०० धावांपर्यंत नेण्यास मदत केली. भारताकडून गोलंदाजी करताना आकाश दीपने सर्वाधिक ३ बळी घेतले, तर मोहम्मद सिराजने २ बळी घेतले.

भारतीय गोलंदाज आकाशने पहिल्या स्पेलमध्ये ७ षटकं फेकून २४ धावांत ३ विकेट्स घेतल्या. त्याने काच षटकात बेन डकेट ( ११) आणि ऑली पोप ( ०) यांना माघारी पाठवलं. नंतर ४२ धावा करणाऱ्या क्राउलीला त्रिफळा उडवला. जॉनी बेअरस्टो आणि जो रूट यांनी अर्धशतकी भागीदारी करत डाव सावरला होता, परंतु आर अश्विननं ही जोडी तोडली. अश्विनने बेअरस्टाला ( ३८) पायचीत केलं. रवींद्र जडेजाने कर्णधार बेन स्टोक्सला ३ धावांवर बाद करत पाचवा धक्का दिला.

जो रूट आणि बेन फोक्स यांनी ६व्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना डाव सावरला. भारतात कसोटीत पाहुण्या फलंदाजांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये रूट ( १०७६) तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याने गॉर्डन ग्रिनीज ( १०४२) आणि मॅथ्यू हेडन ( १०२७) यांना मागे टाकलं आहे. रुट आणि फोक्स यांनी दुसऱ्या सत्रात भारताला एकही विकेट मिळू दिली नाही.

जो रूटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १९ हजार धावांचा टप्पा ओलांडला. हा पल्ला ओलांडणारा तो चौथा जलद फलंदाज ठरलाय. त्याने ४४४ इनिंग्जमध्ये १९ हजार धावा करत रिकी पाँटिंगशी बरोबरी केलीय. रूटने २१९ चेंडूंत कसोटीतील ३१वे आणि भारताविरुद्धचे १० वे शतक पूर्ण केलं. भारताविरुद्ध १० कसोटी शतक झळकावणारा पहिलाच फलंदाज ठरला. रूटने नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ऑली रॉबिन्सनला सोबतीला घेऊन ५७ धावा जोडल्या. संघाला दिवसअखेर ७ बाद ३०२ धावांपर्यंत पोहोचवले.

IND vs ENG 4th Test Day 1
Akash Deep Story : ६ महिन्यांच्या आत वडील, भावाला गमावलं! ३ वर्ष क्रिकेटपासून दूर, आकाशची सक्सेस स्टोरी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com