England Team Ind Vs Eng x
Sports

Ind Vs Eng : भारताचं टेन्शन मिटलं, इंग्लंडचा खतरनाक गोलंदाज दुसरी कसोटी खेळणार नाही

India Vs England : बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टन क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड या दोन संघांमध्ये दुसरा कसोटी सामना २ जुलैपासून खेळला जाणार आहे. या सामन्यातील ११ शिलेदारांची घोषणा इंग्लंडच्या संघाने केली आहे.

Yash Shirke

India Vs England यांच्यामध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. मालिकेतील दुसरा सामना बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टन क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी मोठी अपडेट समोर आली आहे. इंग्लंडच्या संघाने दुसऱ्या सामन्यामध्ये सहभागी होणाऱ्या अकरा शिलेदारांच्या नावांची घोषणा केली आहे.

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर एजबॅस्टन कसोटी सामना खेळण्यासाठी सज्ज झाला होता. पण ऐनवेळी आलेल्या आपत्कालीन परिस्थितीमुळे त्याने अचानक संघ सोडण्याचा आणि दुसरा कसोटी सामना न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडच्या सराव सत्रामध्येही जोफ्रा आर्चर दिसला नव्हता. संघाने प्लेईंग ११ ची घोषणा केली. यामध्ये आर्चरने नाव नव्हते.

पहिल्या भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्यामध्ये इंग्लंडचा विजय झाला होता. या सामन्यात जोफ्रा आर्चर सहभागी झाला नव्हता. काही दिवसांपूर्वी तो दुसरा कसोटी सामना खेळणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. पण काही कौटुंबिक समस्यांमुळे एजबॅस्टन कसोटीमध्ये तो सहभागी होणार नसल्याचे इंग्लंडकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचे ११ शिलेदार

इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन - झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जॅमी स्मिथ, ख्रिस वोक्स, ब्रेडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर

जोफ्रा आर्चर जवळपास चार वर्षांनी कसोटी क्रिकेट खेळणार होता. दुखापतींमुळे तो बराच काळ इंग्लंडच्या कसोटी संघापासून दूर राहिला होता. शेवटचा कसोटी सामना आर्चरने भारताच्या विरोधात खेळला होता. आता पुन्हा भारत विरुद्ध खेळताना तो कसोटी फॉरमॅटमध्ये पुनरागमन करणार होता. पण काही कारणांमुळे तो एजबॅस्टन कसोटीसाठीच्या संघात दिसणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने चांदीचे दर घसरले

Sleep Secrets: रात्री झोपताना एक पाय बाहेर काढण्याची सवय चांगली की वाईट? तज्ज्ञांनी सांगितली कारणे

धनत्रयोदशीनिमित्त मोठी खुशखबर! १० तोळं सोनं १९,१०० रूपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले

IMD Weather Alert: धनत्रयोदशीला आस्मानी संकट येणार, ४८ तास पाऊस धो धो कोसळणार, IMD कडून गंभीर इशारा

Mumbai Heat News : मुंबईकरांना ऑक्टोबर हिटचा तडाखा, पारा 37 अंशावर | VIDEO

SCROLL FOR NEXT