Jasprit Bumrah Saam Tv
Sports

IND vs ENG: जसप्रीत बुमराह इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? सस्पेंस कायम

Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी कसोटीदरम्यान पाठीच्या दुखण्यामुळे दुखापत झाली होती. कालांतराने त्याच्या फिटनेसबाबतचा सस्पेन्स वाढलाय.

Bharat Jadhav

जसप्रीत बुमराह इंग्लंडविरुद्ध भारताच्या आगामी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत खेळणार नाही कारण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्याला १६ सदस्यीय संघातून वगळले आहे. बीसीसीआयने ४ फेब्रुवारी २०२५ रोजी एक निवेदन जारी केले. यामध्ये इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारताच्या अपडेट केलेली यादीत जसप्रीत बुमराहचे नाव या संघात नाही.

टी-20 मालिकेत चमकदार कामगिरी करणाऱ्या वरुण चक्रवर्तीचा संघात समावेश करण्यात आला आहे. तर याआधी बीसीसीआयने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले होतं की, जसप्रीत बुमराह केवळ नागपुरात होणाऱ्या पहिल्या आणि दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात खेळणार नाही. पण शेवटच्या वनडेसाठी तो उपलब्ध असेल.

सिडनी कसोटीदरम्यान बुमराहला झाली दुखापत

जसप्रीत बुमराहला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी कसोटीदरम्यान पाठीच्या दुखण्यामुळे दुखापत झाली होती. कालांतराने त्याच्या फिटनेसबाबतचा सस्पेन्स वाढत गेलाय. चॅम्पियन्स ट्रॉफी आणि इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली तेव्हा मुख्य निवडकर्ता अजित आगरकर म्हणाले होते की इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेसाठी बुमराह तंदुरुस्त होईल अशी आशा होती. आता मात्र यादीत त्याचे नाव नसल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय.

बीसीसीआयने मंगळवारी संध्याकाळी वरुण चक्रवर्तीच्या संघात समावेशाबाबत अधिकृतपणे माहिती देणारे निवेदन जारी केलंय. मात्र यात जसप्रीत बुमराहच्या नावाचा उल्लेख नाहीये. जसप्रीत बुमराहच्या दुखापतीबाबत किंवा इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघातून अनुपस्थितीबाबत बीसीसीआयने अद्याप कोणतेही अधिकृत अपडेट दिलेले नाहीये. बुमराहचे नाव गायब झाल्याने लोकांना आश्चर्याचा धक्का बसलाय.

हा चिंतेचा विषय आहे, कारण चॅम्पियन्स ट्रॉफीला फक्त दोन आठवडे उरले आहेत. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, बुमराह आधीच राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये पोहोचला आहे. ते काही दिवस बेंगळुरूमध्ये राहणार आहेत. एनसीएच्या फिजिओकडून मंजुरी मिळाल्यानंतरच तो परत येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने चांदीचे दर घसरले

Sleep Secrets: रात्री झोपताना एक पाय बाहेर काढण्याची सवय चांगली की वाईट? तज्ज्ञांनी सांगितली कारणे

धनत्रयोदशीनिमित्त मोठी खुशखबर! १० तोळं सोनं १९,१०० रूपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले

IMD Weather Alert: धनत्रयोदशीला आस्मानी संकट येणार, ४८ तास पाऊस धो धो कोसळणार, IMD कडून गंभीर इशारा

Mumbai Heat News : मुंबईकरांना ऑक्टोबर हिटचा तडाखा, पारा 37 अंशावर | VIDEO

SCROLL FOR NEXT