Yashasvi Jaiswal India vs England 5th Test  x
Sports

Yashasvi Jaiswal : यशस्वी भव! ओव्हलच्या मैदानात जैस्वाल शो, इंग्लंडच्या नाकावर टिचून ठोकलं शतक

Yashasvi Jaiswal India vs England 5th Test : ओव्हल कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी यशस्वी जैस्वालने खणखणीत शतक ठोकले आहे. या मालिकेतील जैस्वालचे हे दुसरे शतक आहे.

Yash Shirke

  • ओव्हल स्टेडियममध्ये यशस्वी जैस्वालची शतकीय खेळी

  • भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेत दुसरे शतक

  • शतकीय कामगिरी करत रचला इतिहास

Ind vs Eng 5th Test : भारत विरुद्ध इंग्लंड ओव्हल कसोटी सामन्यामध्ये भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने शतकीय कामगिरी केली आहे. सामन्याच्या पहिल्या डावात २ धावांवर बाद झाल्यानंतर दुसऱ्या डावामध्ये जैस्वालने १०० धावा केल्या आहेत. लीड्स कसोटीनंतर आता ओव्हलमध्ये यशस्वीने ही शानदार खेळी केली आहे. वयाच्या २३ व्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये त्याने तब्बल सहा शतके केली आहेत.

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील यशस्वी जैस्वालचे हे दुसरे शतक आहे. पहिल्या लीड्स कसोटीत त्याने १०१ धावा केल्या आहेत. यशस्वीने ओव्हलच्या मैदानावर त्याच्या कसोटी कारकीर्दीतील सहावे शतक झळकावले आहे. सहापैकी चार शतके त्याने इंग्लंडविरुद्ध खेळताना झळकावली आहेत. जैस्वालने एक शतक ऑस्ट्रेलिया विरुद्ध आणि एक शतक वेस्ट इंडिज विरुद्ध केले आहे.

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेमध्ये सर्वात जलद गतीने २००० धावा पूर्ण करण्याच्या बाबतीत यशस्वी जैस्वालने सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांना मागे टाकले आहे. एजबॅस्टन कसोटी सामन्यादरम्यान त्याने कसोटी क्रिकेट कारकीर्दीमधील २००० धावा पूर्ण केल्या. कसोटी क्रिकेटच्या ४० व्या डावात हा विक्रम पूर्ण केला.

सर्वात कमी डावात दोन हजार धावा पूर्ण करणारा यशस्वी जैस्वाल हा भारताचा संयुक्त पहिला फलंदाज बनला आहे. याआधी माजी भारतीय कर्णधार राहुल द्रविड आणि माजी सलामीवर वीरेंद्र सेहवाग यांनी एकाच डावात कसोटी क्रिकेटमध्ये दोन हजार धावा पूर्ण केल्या आहे. ओव्हलमध्ये शतकीय खेळी करत जैस्वालने इतिहास रचला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gautam Gaikwad: सिंहगडावरून पडला,पाच दिवस जंगलातच; गौतम गायकवाडच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट!

Passenger Boat Accident: भाऊच्या धक्क्याकडे जाणऱ्या प्रवासी बोटीचा अपघात; नेव्हीच्या स्पीड बोटची धडक

Russia-Ukraine War: भारतच रशिया-युक्रेनमध्ये शांतता घडवणार? पुतीन-झेलेन्स्की भारतात येणार

Maratha Reservation: 'चलो मुंबई'! मनोज जरांगेंचा रोष नेमका कोणावर? आंदोलनाचा रोड मॅप नेमका कसा?

Sleep and Earn: झोपा आणि झोपण्याचे पैसे कमवा, 9 तास झोपा, 10 लाख मिळवा

SCROLL FOR NEXT