India vs England 5th Test  x
Sports

Ind vs Eng : DSP सिराजचा पंच! अटीतटीच्या सामन्यात भारताचा ऐतिहासिक विजय, अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी बरोबरीत

India vs England 5th Test : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना ओव्हल क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यामध्ये भारतीय संघाचा विजय झाला आहे.

Yash Shirke

Ind vs Eng Test Series : भारत विरुद्ध इंग्लंड ओव्हल कसोटीमध्ये भारताचा सहा धावांनी विजय झाला आहे. अटीतटीच्या सामन्यामध्ये भारताने इंग्लंडवर मात केली. ओव्हल कसोटी जिंकून भारताने अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी बरोबरीत नेली आहे. भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा हे ओव्हल कसोटीमध्ये भारताच्या विजयाचे शिल्पकार बनले आहेत.

ओव्हलमध्ये भारत विरुद्ध कसोटी जिंकून भारताने इतिहास रचला आहे. ओव्हलच्या मैदानात इंग्लंडच्या संघाला भारताने रनचेज करण्यापासून रोखले आहे. पहिली, तिसरी कसोटी इंग्लंडने जिंकली. एजबॅस्टनमध्ये दुसऱ्या कसोटीत भारताने ऐतिहासिक विजय मिळवला. चौथ्या कसोटीपर्यंत इंग्लंडकडे आघाडी होती. रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी चौथी कसोटी ड्रॉ करण्यासाठी तगडी झुंज दिली. पाचव्या अटीतटीच्या सामन्यात भारताने इंग्लंडला सहा धावांनी पछाडले.

प्रथम फलंदाजी करत भारतीय संघ केवळ २२४ धावांवर सर्वबाद झाला. इंग्लंडने २४७ धावा करत २३ धावांची आघाडी घेतली. भारताच्या पहिल्या डावात करुण नायरने सर्वाधिक ५७ धावा केल्या, तर इंग्लंडकडून हॅरी ब्रूकने ५३ धावांची खेळी केली. दुसऱ्या डावात भारताकडून यशस्वी जैस्वालने शतकी खेळी केली. त्याला साथ देताना आकाश दीप, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी अर्धशतके झळकावली. भारताचा दुसरा डाव ३९६ धावांवर संपला. इंग्लंडच्या प्रत्युत्तरात बेन डकेटने अर्धशतक ठोकले, तर जो रूट आणि हॅरी ब्रूक यांनी शतकीय खेळी केली.

पाचव्या दिवशी नेमकं काय घडलं?

चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर इंग्लंडला जिंकण्यासाठी ३५ धावांची गरज होती, दुसऱ्या बाजूला भारताला ४ विकेट्स घ्यायच्या होत्या. पहिल्या सत्रामध्ये भारताने जेकब बेथेलची विकेट घेतली. त्यानंतर जेमी स्मिथला मोहम्मद सिराजने बाद केले. जेमी ओव्हरटनच्या विकेटनंतर दुखापतग्रस्त ख्रिस वोक्स फलंदाजीसाठी आला. शेवटच्या क्षणी भारताला एक विकेट आणि इंग्लंडला ७ धावांची गरज होती. मोहम्मद सिराजने गस अॅटकिन्सनला क्लीनबोल्ड करत भारताला सामना जिंकवून दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

SCROLL FOR NEXT