rohit sharma twitter
क्रीडा

Rohit Sharma Statement: या खेळाडूंसाठी टीम इंडियाचे दार कायमचे बंद? रोहित शर्माचा मोठा खुलासा

India vs England 4th Test: भविष्यात कोणते खेळाडू कसोटी क्रिकेट खेळताना दिसून येतील? या प्रश्नाचं उत्तर देताना भारतीय कर्णधार रोहित शर्माने मोठा खुलासा केला आहे.

Ankush Dhavre

Rohit Sharma, India vs England 4th Test:

भविष्यात कोणते खेळाडू कसोटी क्रिकेट खेळताना दिसून येतील? या प्रश्नाचं उत्तर देताना भारतीय कर्णधार रोहित शर्माने मोठा खुलासा केला आहे. रोहित शर्माने स्पष्ट केलं आहे की, ज्या खेळाडूंना कसोटी क्रिकेट खेळण्याची इच्छा आहे, अशाच खेळाडूंना संघात स्थान दिलं जाईल. रोहितच्या मते कसोटी क्रिकेट हा क्रिकेटमधील सर्वात आव्हानात्मक फॉरमॅट आहे. त्यामुळे कसोटी क्रिकेट खेळणं सर्वांनाच जमेल असं नाही.

याबाबत बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, ' ज्या लोकांना कसोटी क्रिकेट खेळण्याची खरच इच्छा आहे, अशाच लोकांना संघात स्थान दिलं जाईल. टीम मॅनेजमेंट अशा खेळाडूंना मुळीच प्राधान्य देणार नाही जे कसोटी क्रिकेटपासून दूर पळतात. कसोटी क्रिकेट खेळणं खूप कठीण आहे. या फॉरमॅटमध्ये यशस्वी होण्यासाठी तुमच्यात ती भूक असणं गरजेचं आहे..'

रोहितचा इशारा नेमका कोणाकडे?

रोहितचा हा इशारा इशान किशन आणि श्रेयस अय्यरसाठी असल्याचं म्हटलं जात आहे. कारण इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी संघात स्थान मिळवण्यासाठी इशान किशनला रणजी ट्रॉफी खेळण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र त्याने ऐकलं नाही. तर दुसरीकडे संघातून बाहेर केल्यानंतर श्रेयस अय्यरलाही रणजी ट्रॉफी खेळण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र श्रेयस अय्यरने दुखापतग्रस्त असल्याचं नाटक केलं. त्यामुळे टीम मॅनेजमेंट या दोन्ही खेळाडूंवर नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. (Cricket news marathi)

भारताचा शानदार विजय...

वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत युवा खेळाडूंना पदार्पण करण्याची संधी मिळाली. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत पदार्पण करणाऱ्या सरफराज खान, आकाश दीप आणि ध्रुव जुरेल यांनी मिळून दमदार खेळ केला. भारतीय संघाच्या विजयात या तिघांनी मोलाचं योगदान दिलं आहे. या शानदार कामगिरीच्या बळावर भारतीय संघाने कसोटी मालिकेत ३-१ ने विजयी आघाडी घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : एकनाथ शिंदे ४००० मतांनी आघाडीवर

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

Kolhapur Crime News : कोल्हापूरच्या आदमापूर येथे गोळीबार; पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT