IND vs ENG 4th Test saam tv
Sports

IND vs ENG: चौथ्या टेस्ट सामन्यावर पावसाचं सावट; सिरीज वाचवण्यासाठी कशी असेल टीम इंडियाची प्लेईंग 11

IND vs ENG 4th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका निर्णायक टप्प्यावर आली आहे. चौथ्या कसोटी सामन्यावर पावसाचे गडद सावट असल्याने दोन्ही संघांची चिंता वाढली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

  • भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या टेस्ट सिरीजमध्ये इंग्लंड 2-1 ने आघाडीवर आहे.

  • चौथा टेस्ट सामना 23 ते 27 जुलैदरम्यान मॅनचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर होत आहे.

  • भारतासाठी हा सामना ‘करो या मरो’च्या परिस्थितीत आहे, तर इंग्लंड 3-1 अजेय आघाडी मिळवण्याचा प्रयत्न करेल.

भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या टेस्ट सिरीज सुरु आहे. ५ सामन्यांच्या या टेस्ट सिरीजमध्ये इंग्लंड 2-1 ने आघाडीवर आहे. तीन सामन्यांनंतर आता सिरीजमधील चौथा आणि महत्त्वाचा सामना आजपासून म्हणजेच 23 जुलैपासून मॅंचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर होणार आहे. इंग्लंड हा सामना जिंकून 3-1 अशी आघाडी मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र भारतासाठी हा सामना सिरीजमध्ये बरोबरीत आणण्यासाठी ‘करो या मरो’सारखी परिस्थिती असणार आहे.

चौथा टेस्ट सामना कुठे पाहता येईल?

भारत विरूद इंग्लंड यांच्यातील चौथा सामना 23 ते 27 जुलैदरम्यान ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टरमध्ये खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार प्रत्येक दिवशी दुपारी 3:30 वाजता खेळ सुरू होईल. हा सामना JioCinema अ‍ॅपवर ऑनलाइन लाईव्ह पाहता येणार आहे. तर टेलिव्हिजनवर Sony Sports Network वर त्याचा थेट प्रसारण होणार आहे.

कसं असे पीच?

ओल्ड ट्रॅफर्ड मैदानाचं पीच नेहमी कोरडं आणि स्पिनला मदत करणारी असतं. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मॅंचेस्टरमध्ये सातत्याने पाऊस पडतोय त्यामुळे खेळाच्या सुरुवातीला पिचमध्ये ओलसरपणा राहू शकतो. त्यामुळे पहिल्या दिवशी जलदगती गोलंदाजांना अधिक फायदा होण्याची शक्यता आहे. इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज स्टीव्ह हार्मिसन याच्या मते, या पिचवर फारसा बाउंस नसेल आणि हा सामना कमी लो स्कोअरिं) ठरण्याची शक्यता आहे.

सामन्यादरम्यान हवामान कसं असणार आहे?

मॅंचेस्टरमध्ये गेल्या एका आठवड्यापासून सतत पावसाचं वातावरण आहे. त्यामुळे पाचही दिवस पावसाचा व्यत्यय राहण्याची शक्यता वर्तवली जातेय. पहिल्या दिवशी 85% पावसाची शक्यता असून तापमान सुमारे 14°C पर्यंत खाली जाण्याचा अंदाज आहे. दुसऱ्या दिवशी पूर्ण दिवस पाऊस असण्याची शक्यता वर्तवण्यात आलीये. तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी तुलनेने कमी पाऊस असणार आहे.

टीम इंडियाला दुखापतींचं ग्रहण

भारताच्या दृष्टीने चौथ्या टेस्टपूर्वी काही अडचणी उभ्या राहिल्या आहेत. नितीश रेड्डी दुखापतीमुळे आधीच सिरीज बाहेर गेला आहे. आकाशदीप आणि अर्शदीप हे दोघंही अजून पूर्णपणे फीट नाहीयेत. त्यामुळे अंशुल कंबोजला संघात संधी दिली जाऊ शकते. कर्णधार शुभमन गिलने स्पष्ट केलंय की, आकाशदीप हा सामना खेळणार नाही. दुसरीकडे, लॉर्ड्स टेस्टमध्ये दुखापत झालेला ऋषभ पंत ओल्ड ट्रॅफर्डवर विकेटकीपर म्हणून कमबॅक करणार आहे.

भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, करुण नायर, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अंशुल कंबोज

इंग्लंडची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ, लियाम डॉसन, ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर

भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा टेस्ट कोठे आणि कधी होत आहे?

हा सामना 23 ते 27 जुलैदरम्यान ओल्ड ट्रॅफर्ड, मॅनचेस्टर येथे होत आहे.

टेस्ट सामना कोणत्या चॅनेलवर पाहता येईल?

सामन्याचे प्रसारण Sony Sports Network वर होईल आणि JioCinema अ‍ॅपवर लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.

ओल्ड ट्रॅफर्डच्या पिचची स्थिती कशी अपेक्षित आहे?

पावसामुळे पिचवर ओलसरपणा राहील, त्यामुळे पहिल्या दिवशी फास्ट बॉलर्सना फायदा होण्याची शक्यता आहे.

भारतीय संघात कोणत्या दुखापतींचा त्रास आहे?

नितीश रेड्डी बाहेर आहे, आकाशदीप आणि अर्शदीप पूर्ण फीट नाहीत; अंशुल कंबोज ला संधी मिळू शकते.

ऋषभ पंत या सामन्यात का महत्त्वाचा आहे?

लॉर्ड्स टेस्टमध्ये दुखापत झाल्यानंतर ऋषभ पंत विकेटकीपर म्हणून कमबॅक करत आहे, ज्यामुळे तो महत्त्वाचा खेळाडू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: ५ राज्यात कोणाचं सरकार होणार? विधानसभा निवडणुकांचा धक्कादायक सर्व्हे आला समोर

Daund Firing Case: दौंड गोळीबार प्रकरण; आमदाराच्या भावाला अटक करा; तृप्ती देसाईंची मागणी

फडणवीसांचा शिंदे-दादांना झटका,नगरविकास'च्या उधळपट्टीला फडणवीसांकडून चाप?

Online Gaming Maharashtra: ऑनलाईन रमीच्या नादात घरदार, शेती गमावली; डोक्यावर झालं 80 लाखांचं कर्ज

High BP: हाय बीपीचा त्रास असल्यास शरीरात दिसतात 'ही' लक्षणे

SCROLL FOR NEXT