भारतीय संघाला चौथा कसोटी सामना जिंकण्यासाठी १९२ धावांचं आव्हान आहे. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने तिसऱ्या दिवसाखेर बिनबाद ४० धावा केल्या आहेत. भारतीय संघाला अजूनही जिंकण्यासाठी १५२ धावांची गरज आहे. दरम्यान इंग्लंड संघाच्या नावे नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे.
या सामन्यातील दुसऱ्या डावात इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या १४५ धावांवर संपुष्टात आला. इंग्लंडच्या सर्व १० फलंदाजांना भारतीय फिरकी गोलंदाजांनी बाद केलं. यादरम्यान आर अश्विनने ५ गडी बाद केले. तर कुलदीप यादवने ४ आणि रविंद्र जडेजाने १ गडी बाद केला. इंग्लंडकडून फलंदाजी करताना जॅक क्रॉलीने सर्वाधिक ६० धावांची खेळी केली. तर बेअरस्टोने ३० धावा केल्या. या दोघांना वगळलं तर इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.
रांची कसोटीतील दुसऱ्या डावात इंग्लंडचे फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले. इंग्लंडला ५३.५ षटकात अवघ्या १४५ धावा करता आल्या. यादरम्यान इंग्लंडने २.६९ च्या सरासरीने धावा केल्या. बेन स्टोक्स आणि ब्रेंडन मॅक्क्यूलमच्या मार्गदर्शनाखाली खेळताना इंग्लंडने पहिल्यांदाच अशी निराशाजनक कामगिरी केली आहे. बॅझबॉलचं सुरू झाल्यापासून इंग्लंडने पहिल्यांदाच इतक्या कमी सरासरीने धावा केल्या आहेत. (Cricket news in marathi)
या सामन्यातील पहिल्या डावात इंग्लंडने १०४.५ षटकात ३.१३ च्या सरासरीने ३५३ धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या डावात इंग्लंडच्या फलंदाजांना ५३.५ षटकात १४५ धावा करता आल्या आहेत. तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात भारतीय संघ विजयाच्या अगदी जवळ आहे. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १९२ धावांची गरज आहे.
enया धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने तिसऱ्या दिवसाखेर ४० धावा केल्या आहेत. म्हणजे चौथ्या दिवशी भारतीय संघाला जिंकण्यासाठी आणखी १५२ धावा करायच्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.