भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने शानदार विजयाची नोंद केली होती. मात्र त्यानंतर तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय फलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती.
मात्र राजकोटमध्ये झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाज फ्लॉप ठरले. फलंदाजीत एकटा हार्दिक पंड्या खेळपट्टीवर टिकून राहिला. तर गोलंदाजीत वरुण चक्रवर्तीला वगळलं, तर मोहम्मद शमी आणि रवी बिश्नोई यांना आपली छाप सोडता आलेली नाही.
मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये बदल करण्यात आले आहेत. तिसऱ्या सामन्यासाठी अर्शदीप सिंगला बसवून मोहम्मद शमीला प्लेइंग ११ मध्ये स्थान देण्यात आलं होतं. तिसऱ्या सामन्यातील कामगिरी पाहता चौथा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये बदल केले जाऊ शकतात.
भारतीय संघातील आक्रमक फलंदाज रिंकू सिंगला इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात स्थान दिलं गेलं आहे. मात्र फिट नसल्यामुळे त्याला सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये प्लेइंग ११ मध्ये स्थान दिलं गेलं नव्हतं.
टॉप ऑर्डर कोसळल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजही धावा करण्यात अपयशी ठरत आहेत. सूर्यकुमार यादवही योगदान देण्यात अपयशी ठरतोय. त्यामुळे मधल्या फळीत धावा करण्यासाठी रिंकू सिंगसारख्या आक्रमक फलंदाजाला प्लेइंग ११ मध्ये संधी दिली जाऊ शकते.
एकीकडे भारताचा फिरकीपटू वरुण चक्रवर्ती चांगली कामगिरी करतोय. तर दुसरीकडे रवी बिश्नोई फ्लॉप ठरतोय. वरुणने १० गडी बाद केले आहेत. तर रवीला केवळ १ गडी बाद करता आला आहे. त्यामुळे पुढच्या सामन्यात रवीची सुट्टी होऊ शकते. तर अर्शदीप सिंगला कमबॅक करण्याची संधी दिली जाऊ शकते.
संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.